छडी, खडू-फळा, मधली सुट्टी, डबा सगळेच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:49+5:302020-12-31T04:11:49+5:30
ऑनलाईन शिक्षण : ‘घर रंगले शाळेत’ अशी घरोघर स्थिती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात पहिलीपासून विद्यापीठातल्या महाविद्यालयीन ...
ऑनलाईन शिक्षण : ‘घर रंगले शाळेत’ अशी घरोघर स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात पहिलीपासून विद्यापीठातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे शिक्षण ऑनलाईन झाले. या अभूतपुर्व स्थितीला सामोरे जाताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अंतिम वर्षाच्या परीक्षा नियोजित कालावधीत घेऊन त्यांचे निकाल जाहीर केले. तसेच पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठे सामाजिक काम उभे केले.
कोरोनामुळे विद्यापीठाला विकास कामांना व खर्चाला कात्री लावावी लागली. अंतिम वर्षाच्या व प्रथम वर्ष ते अंतिमपूर्व वर्षाच्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली. परीक्षेनंतर जाहीर करण्यात आलेल्या निकाला गोंधळा झाला असला तरी सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत आवश्यक निर्णय घेतले.परंतु,काही विद्यार्थ्यांच्या निकालात अद्याप दुरूस्ती झालेली नाही. आॅनलाईन परीक्षा घेण्याची आणि परीक्षा देण्याची विद्यापीठाची व विद्यार्थ्यांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे सरत्या वर्षात एक मोठा अनुभव सर्वांनाच मिळाला.
लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद ठेवावी लागल्याने विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीनेच शिकवता येणार होते.त्या मुळे विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. इंटरनेट कनेक्टिव्हीटीबाबत अडचण असताना सुध्दा या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, अशी यंत्रणा निर्माण करण्यात आली. त्यासाठी पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी विविध विषयाचा कंटेन्ट तयार करून अपलोड केला. विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकाराचे ‘युजीसी’चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी कौतुक केले.
चौकट
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला. विद्यापीठाशी निगडीत सर्व घटकांच्या सहकार्यामुळे ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षा घेता आल्या. तसेच कोरोना विरुध्दच्या लढ्यात विद्यापीठाच्या प्राध्यापक व विद्यार्थी व सर्वांनीच योगदान दिले.”
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ