भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:34 AM2024-04-16T09:34:15+5:302024-04-16T09:34:29+5:30
भाग्यश्री सुडेचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले
पुणे : वाघोली परिसरात अभियांत्रिकीच्या तिस-या वर्षात शिक्षण घेणा-या भाग्यश्री सुडे हिचा खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेला स्टिकीन्ग टेप आणि कारच्या काचांना लावण्यासाठी खरेदी केलेले काळ्या रंगाचे मॅग्नेटिक कर्टन्स कुठून खरेदी केले आहेत ती ठिकाणे आरोपींनी दाखविली आहे. तसेच तिचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात दिली. न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे.
शिवम माधव फुलवळे ( वय २१ रा. वाघोली पुणे मु.रा नांदेड) , सुरेश शिवाजी इंदुरे (वय २३ रा. सकनूर ता मुखेड नांदेड) व सागर रमेश जाधव (रा. हलकी ता. शिरोळा लातूर) या तिघांना तरुणीच्या खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. या तिघांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. १५) संपल्याने त्यांना तपास अधिकारी सर्जेराव कुंभार यांनी न्यायालयात हजर केले .यावेळी सरकारी वकील रेणुका देशपांडे -कर्जतकर यांनी युक्तिवाद केला की तरुणीच्या खुनानंतर तिच्या अंगावरील सोन्याची अंगठी, कानातील दोन टॉप्स, व एक मित्राकडे ठेवलेले पेंडल जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी गुन्हयात वापरलेली किया सेलटॉस कारची तपासणी करण्यात आली. त्यात तिचे केसाचे नमुने, लाईटर आणि रक्ताचे नमुने हे सॅम्पल्स देखील जप्त करण्यात आले आहेत. तसेच मायाताचा व्हिसेरा तपासणी होऊन अभिप्राय मिळवण्यासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे
पाठविविण्यात आला आहे. आरोपींनी तिच्या मोबाईल मधील सिमकार्ड काढून तिच्या ते दुस-या मोबाईल मध्ये टाकून त्याद्वारे मयत मुलीच्या पालकांना धमकीचे व नऊ लाख रुपयांच्या खंडणीचे मेसेज करण्यात आले. हा गुन्हा उच्च
शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलांनी खंडणी आणि खुनासाठी अपहरण करून खून केल्याचा गंभीर गुन्हा आहे. त्यांचे इतर साथीदार कोना आहेत? आणखी कोणत्या हत्याराचा वापर त्यांनी केला आहे. याचा तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दि. २० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.