कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:50 AM2018-12-19T00:50:32+5:302018-12-19T00:51:02+5:30

ओतूरजवळील चार पडाळी येथील किरण अहिनवे यांच्या घराजवळ कोंबड्यांचे खुराडे आहे.

Sticky Leopard in the Chicken Patch | कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या

कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Next

ओतूर : येथील चार पडाळी वस्तीवरील किरण अहिनवे यांच्या घराजवळ सुमारे दहा-बारा कोंबड्यांच्या बंदिस्त खुराड्यात मंगळवारी बिबट्या घुसला. त्याने सर्व कोंबड्या फस्त केल्या. मात्र, खुराड्यातून बाहेर न पडता आल्याने बिबट्या खुराड्यातच अडकला. या घटेनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यावर माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले.

ओतूरजवळील चार पडाळी येथील किरण अहिनवे यांच्या घराजवळ कोंबड्यांचे खुराडे आहे. मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याने खुराड्याची लोखंडी तारेची जाळी तोडून खुराड्यात प्रवेश करून कोंबड्या फस्त करू लागला. तेव्हा इतर कोंबड्या कलकलाट करू लागल्या. त्यांच्या आवाजाने किरण अहिनवे यांचे वडील जागे झाले. त्यांनी सुनेला कोंबड्यांना खाद्य टाकण्यास सांगितले. सून खुराड्याजवळ गेली तेव्हा त्या दरवाजा उघडणार तेवढ्यात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. खुराड्याचा दरवाजा बंद असल्याने त्या बचावल्या. त्यांनी घाबरत थेट घरात जाऊन खुराड्यात बिबट्या असल्याचे सांगितले. घरच्यांनी खुराड्याची पाहणी केली असता. त्यात बिबट्या दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती वन विभागाला कळवली.
वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बापू बेळे यांनी ही माहिती माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांना कळविले. तसेच स्वत: व वनपाल चैतन्य कांबळे, मोढवे, वनरक्षक जराड, पवार यांच्यासह अहनिवे यांच्या घरी हजर झाले. डॉ अजय देशमुख, डॉ. महेंद्र ढोले यांचे पथकही घटनास्थळी पोहचले. डॉ. देशमुख यांनी पिंजºयातील बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले. बिबट्या बेशुद्ध झाल्यावर त्याला खुराड्यातून बाहेर काढून पिंजºयात टाकून त्याला बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले. या बिबट्याचे वय सुमारे अडीच वर्षे आहे.

राजुरीत दोन कालवडी, दोन शेळ्या ठार
राजुरी : परिसरात बिबट्याने दोन कालवडी, दोन शेळ्या व एका मेंढीवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना सोमवारी घडली. राजुरी (ता. जुन्नर) येथील आबाटेक रोड मळ्यामधील बबन खंडू औटी यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला आपल्या दारासमोरील गोठ्यात बांधले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांना जनावरांचा ओरडण्याचा आवाज आला. ते घराबाहेर आले असता त्यांना बिबट्याने कालवडीला ठार करून तिला फरफटत उसाच्या पिकात नेत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला.
दुसºया झालेल्या घटनेत याच गावातील गुरव शेतमळ्यातील सुदाम औटी यांच्या घराजवळच १० ते १२ गाई असलेला मोठा गोठा आहे. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आला. ते बॅटरी व काठी घेऊन गोठ्याजवळ गेले असता, त्यांना बिबट्याने कालवडीवर हल्ला करून तिला ठार केल्याचे दिसले. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या कालवडीला सोडून पळून गेला. सुदैवाने बिबट्याने त्यांच्या वर हल्ला केला नाही. तिसºया घटनेत याच गावात उंचखडक रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले विलास मोरे या मेंढपाळाच्या दोन मेंढ्या व एक शेळी बिबट्याने मारून टाकल्या आहेत. घटनास्थळी वनखात्याचे जे. बी. सानप, तसेच कर्मचाºयांनी भेट देऊन पंचनामा केला. या वेळी त्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले. वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी व गावचे सरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी केली आहे.
 

Web Title: Sticky Leopard in the Chicken Patch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे