मिरवणूक : कार्यकर्त्यांनी बुक्का फेकल्याने खडकीत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:26 AM2018-09-25T01:26:22+5:302018-09-25T01:26:33+5:30
महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते.
खडकी - महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते. तेथे उपाध्यक्ष व नगरसेवकांवर काळा बुक्का फेकल्याने वादंगाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणी उपाध्यक्ष चासकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार डेपो लाइन मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती खडकी पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ऊर्फ बंडू चव्हाण, शैलेश गर्गे, मिलिंद खाडे, चेतन गाडे अशी गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. गुन्हे दाखल करून पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खडकी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्या वेळी निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले. स्वागत कक्षाच्या स्टेजवर गर्दी झाल्याने स्टेज कोसळला. स्टेजवरच उपाध्यक्ष चासकर नगरसेवक कांबळे दादा कचरे योगेश कर्नूर आदी कार्यकर्ते होते. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते स्टेजवर आल्यामुळे स्टेज कोसळला़ त्यात नगरसेवक सुरेश कांबळे किरकोळ जखमी झाले. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते स्वत: घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांना धक्काबुक्की
खडकी : मिरवणुकीत पुढे जाण्यावरून दोन गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या बब्रुवान पांडुरंग भोरे या पोलीस कर्मचाऱ्यास कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांसी उद्धट वर्तन करणाºया अभिजित क्षीरसागर, सुमेन तांबोळी, प्रशांत काळे या कार्यकर्त्यांना पोलिांनी ताब्यात घेतले होते. त्यातील अभिजित क्षीरसागर या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.