Exclusive : डेटिंग ते शरीरसंबंध... पुण्यात 'मुली पुरवणारं' ऑनलाईन रॅकेट, संभाषण ऐकून हादराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 08:11 AM2018-08-29T08:11:22+5:302018-08-29T12:11:13+5:30

हॅलो, वाँट टू चॅट विथ मी, प्लीज कॉल फॉर डेटिंग, मीटिंग असे मेसेज आले असतील तर सावधान!

sting operation on dating racket in pune | Exclusive : डेटिंग ते शरीरसंबंध... पुण्यात 'मुली पुरवणारं' ऑनलाईन रॅकेट, संभाषण ऐकून हादराल!

Exclusive : डेटिंग ते शरीरसंबंध... पुण्यात 'मुली पुरवणारं' ऑनलाईन रॅकेट, संभाषण ऐकून हादराल!

googlenewsNext

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : हॅलो, वाँट टू चॅट विथ मी, प्लीज कॉल फॉर डेटिंग, मीटिंग असे मेसेज तुमच्यापैकी अनेकांना आले असतील. तरुणांना अशा प्रकारचे मेसेज पाठवून हाय प्रोफाईल डेटिंगच्या नावाखाली आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणाऱ्या एजन्सीचे मोठ्या शहरांमध्ये पेव फुटले आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल आणि फोन करण्याच्या तयारीत असाल तर सावधान!

मेट्रो शहरांमधील धावपळीच्या आयुष्यात तरुणांच्या जीवनशैलीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. उच्च पदाची नोकरी, पैसा असूनही आयुष्यात विरंगुळा करण्याजोगा वेळ आणि कारणच उरलेले नाही. अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी रहायला जातात. कामाचा ताण, घरापासून दूर राहत असल्याने येणारा एकटेपणा यातून अनेकदा तरुणांना नैराश्याचा सामना करावा लागतो. एकटेपणा दूर करण्यासाठी एन्जॉयमेंटचे विविध पर्याय हाताळले जातात. तरुणांची हीच मानसिकता हेरुन मोठ्या शहरांमध्ये अनेक फ्रेंडशिप आणि डेटिंग एजन्सी हाय प्रोफाईल माध्यमातून तरुणांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. लोकमत प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अशी फसवणूक होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. अशा प्रकारांपासून पोलीस प्रशासन मात्र पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

पुण्यासारख्या शहरांमध्ये अशा डेटिंग एजन्सीचे पेव फुटले आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या डेटामधून अनेक तरुणांच्या मोबाईल क्रमांकांवर हाय, वॉंट टू चॅट विथ मी? कॉल मी फॉर डेटिंग, मीटिंग अँड फ्रेंडशिप अशा स्वरुपाचे मेसेज आणि फोन नंबर पाठवले जातात. अनेक तरुण उत्सुकता म्हणून या क्रमांकावर फोन करतात. फोनवरुन त्यांना डेटिंग, मीटिंग, फिजिकल रिलेशनशिप याबाबतच्या मेंबरशिपची माहिती दिली जाते.

एजन्सीच्या विविध पॅकेजना भुलणाऱ्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटनाच्या यातून पुढे आल्या आहेत. ऑनलाईन पैसे भरायला सांगितल्यानंतर एजन्सीकडून आणखी काही पैशांची मागणी केली जाते. दोन-तीनदा पैसे भरुन झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तरुणांची याबाबत विचारणा केली असता, संबंधित मोबाईल क्रमांक बंद करुन टाकला जातो. अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुलगा आणि कॉल सेंटरमधील मुलीमध्ये झालेलं संभाषण

मुलगा : मला तुमच्याकडून डेटिंगचा मेसेज आला आहे.

कॉल सेंटर : हॅलो सर, मी फ्रेंडशिप एजन्सीमधून बोलते आहे. आमच्या माध्यमातून हाय प्रोफाईल तरुणींसह डेटिंग, मीटिंग, चॅटिंग आणि पर्सनल रिलेशनशिपसाठी मदत करतो. तुम्ही इंटरेस्टेड आहात का?

मुलगा : यासाठी काय करावे लागते?

कॉल सेंटर : आमच्याकडे तीन प्रकारच्या मेंबरशिप आहेत. २००० रुपये भरुन १ महिन्याच्या कालावधीचे पॅकेज मिळते. एका महिन्याला २० दिवस मिळतात. ३५०० रुपये भरल्यास तीन महिन्याचे पॅकेज आणि महिन्यातील २५ दिवस डेटिंगसाठी मिळतात. ५००० रुपयांमध्ये सहा महिन्याचे पॅकेज मिळते.

मुलगा : डेटिंग म्हणजे काय ते सविस्तर सांगाल का?

कॉल सेंटर : यामध्ये तुम्ही मिटिंग, एन्जॉयमेंटसह फिजिकल रिलेशनशिपसुध्दा ठेवू शकता.

मुलगा : मी मला हवी ती मुलगी डेटिंगसाठी निवडू शकतो का?

कॉल सेंटर : ऑनलाईन पध्दतीने पैसे भरुन मेंबरशिप भरल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेसफूलचा मेसेज येईल. तुम्हाला तो मेसेज आम्हाला व्हॉटस अ‍ॅप करायचा आहे. त्याच नंबरवर आम्ही तुम्हाला पाच मुलींचे फोटो पाठवू. त्यापैकी एक मुलगी तुम्हाला निवडता येईल.

मुलगा : पुण्यामध्ये ही सुविधा आहे का?

कॉल सेंटर : हो. पुण्यामध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत. कंपनीत मोठ्या पदांवर काम करणाऱ्या तरुणांकडे खूप पैसे असतात. मात्र, घरापासून लांब राहिल्याने आयुष्यात काहीच एन्जॉयमेंट उरलेली नसते. अशी एन्जॉयमेंट मिळण्याच्या दृष्टीने आमची कंपनी मेंबरशिप देते. 

मुलगा : यामध्ये गुप्तता पाळली जाते का?

कॉल सेंटर : होय, तुम्ही डेटिंग करत असताना पूर्ण गुप्तता पाळली जाते. तुमची अथवा त्या मुलीची ओळख पूर्ण गुप्त ठेवली जाते, कोणालाही कळणार नाही, अशी व्यवस्था केली जाते. तुम्ही कधी मेंबरशिप घेताय? कधीपर्यंत कळवाल?

मुलगा : उद्यापर्यंत कळवतो.
    
सायबर सेलकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. मात्र, तरुणांनी अशा प्रकारांपासून सावध राहण्याची गरज आहे. तक्रार दाखल झाल्यास किंवा कोणी निदर्शनास आणून दिल्यास संबंधित प्रकरणी कारवाई केली जाईल.
- जयराम पायगुडे, पोलीस निरिक्षक, सायबर सेल

डेटिंगसाठी पैसे भरल्याची तक्रार घेऊन मध्यंतरी एक गृहस्थ सामाजिक सुरक्षा विभागाकडे आले होते. त्यानंतर सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या प्रकरणाचे पुढे काय झाले, याची कल्पना नाही. यापुढे अशा प्रकरणांची जास्तीत जास्त गांभीर्याने दखल घेतली जाईल.
- मनीषा झेंडे, पोलीस निरिक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग

Web Title: sting operation on dating racket in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे