खांडज परिसरात एसटीवर दगडफे क
By admin | Published: July 29, 2014 10:55 PM2014-07-29T22:55:59+5:302014-07-29T22:55:59+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणास विरोधानंतर या आंदोलनाने हिंसक वळण घेतले.
Next
माळेगाव : धनगर समाजाच्या आरक्षणास विरोधानंतर या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. सोमवारी रात्री फलटण-बारामती रस्त्यावर फलटण-बारामती एसटीवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक क रून बसच्या काचा फोडल्या.
4रात्री साडेआठच्या सुमारास फलटणवरून बारामतीकडे येणा:या बस (क्रमांक एम.एच.12 इफ 6399) च्या काचा अज्ञात व्यक्तिंनी पाठीमागील बाजुंनी फोडल्या.
4यामुळे प्रवाशांच्यात घबराट निर्माण झाली होती. वाहक व चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यांनी ताबडतोब हा प्रकार बारामती आगार व माळेगाव पोलीस ठाण्यास कळविला.
4माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये
तीन अज्ञात व्यक्तिंविरोधात
फिर्याद दाखल झाली आहे,
घेत आहेत.
4या घटनेचा तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, माळेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणोश म्हस्के, सहाय्यक पोलीस फौजदार बी. बी. भोसले व पोलीस कर्मचारी शरद वारे, ओंकार सिताप करत आहेत.
शांतता, संयम ठेवा
4आरक्षणाच्या लढाई तरूण कार्यत्र्यानी शांतता व संयम ठेवावा.
4कोणतीही अनुचित प्रकार घडू नये. याची काळजी घ्यावी, असे आवाहन माळेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणोश म्हस्के यांनी केले आहे.