चोरीचे मोबाईल घेणारा अटकेत
By admin | Published: October 14, 2016 05:11 AM2016-10-14T05:11:30+5:302016-10-14T05:11:30+5:30
कल्याणीनगर येथील रिलायन्स डिजिटल कंपनीतील सव्वा दोन लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक
पुणे : कल्याणीनगर येथील रिलायन्स डिजिटल कंपनीतील सव्वा दोन लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यास येरवडा पोलिसांनी अटक केली आहे़ सलमान महमंद पटेल (वय २४, रा़ साईबाबानगर, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे़ मोबाईल चोरणाऱ्या इस्लाम लायकअली तांबोळी (वय २५, रा़ गांधीनगर, येरवडा) याला यापूर्वीच अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे़
याप्रकरणी शामलिया अनुग्रह कुमार (वय ३३, रा़ आंबेगाव पठार, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे़ तांबोळी हा रिलायन्स डिजिटल कंपनीत नोकरीस असताना स्टोअर मॅनेजर काही दिवस सुटीवर असताना त्याच्याकडे कार्यभार देण्यात आला होता़ त्या काळात त्याने १३ मोबाईल, रोटर, मोमरी कार्ड, पेनड्राईव्ह असा २ लाख २१ हजार ६५१ रुपयांच्या मालाचा अपहार केला़
स्टोअरचे अॅडिट करीत असताना हा अपहार केल्याचे दिसून आले़ तांबोळी याला अटक करुन तपास केला असता त्याने चोरलेले मोबाईल सलमान पटेल याला विकल्याचे सांगितले़ त्यावरुन सलमान पटेल याला अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले़ सरकारी वकील वामन कोळी यांनी न्यायालयास सांगितले की, पटेल याने हे मोबाईल चोरीचे असल्याचे माहित असतानाही विकत घेतले असून ते कोणाला विकले याचा शोध घेऊन ते हस्तगत करायचे
आहेत़
मोबाईल विक्री करुन मिळालेले पैसे जप्त करायचे आहेत़ त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे़ न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरुन पटेल याला १४ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़