रिक्षाच्या डिक्कीतून दागिने लंपास :दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 05:13 PM2019-05-03T17:13:16+5:302019-05-03T17:16:47+5:30
दोन चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवासाच्या वेळी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून दोघांनी एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचे दागिने लांबविले.
पुणे: दोन चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवासाच्या वेळी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून दोघांनी एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचे दागिने लांबविले. दुस-या एका घटनेत स्वारगेट ते तळा या एस.टी बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या छोट्या पाऊच मधून आठ हजारांची रोकड व सोन्याचे दागिन्यांचा 1 लाख 45 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरला.
याप्रकरणी अरविंद कसबेकरट (वय-69,रा.बालाजीनगर कुमठानाका सोलापुर) यांनी दिलेल्या फियार्दीवरून दोन अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कसबेकरट हे स्वारगेट ते आंबेगाव असा रिक्षाने प्रवास करत होते. यावेळी त्यांनी आपल्याकडील बॅग रिक्षाच्या डिक्कीत ठेवली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादीच्या बॅगमधून सोन्याचे दागिने लंपास केले. तर दुस-या घटनेत मिना सुभाष जाधव (वय-38 रा. इंदापूर, ता.माणगाव जि.रायगड ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या स्वारगेट येथून तळा या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी छोट्या पाऊच मधून रोकड व सोन्याचे दागिने असा 1 लाख 45 हजारांचा ऐवज चोरी केला. पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.