चोरीला गेलेली पंचधातूची मूर्ती दोन तासात सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 03:14 PM2018-04-18T15:14:00+5:302018-04-18T15:14:00+5:30
पुण्यातील लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवर असलेले श्री दत्त समाज तरुण मंडळाच्या श्री सिध्दिविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंचधातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाल्याची घटना घडली आहे .
पुणे : पुण्यातील लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवर असलेले श्री दत्त समाज तरुण मंडळाच्या श्री सिध्दिविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंचधातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाल्याची घटना घडली आहे .अमर बळीराम अवघडे (राहणार - सातारा , वय २१) हा पुणे रेल्वे स्थानकावरून सातारा येथे रेल्वे आपल्या गावी पळून चालला होता . या व्यक्तीला पुणे स्टेशनवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील लष्कर भागातील सोनारांची मुख्य बाजारपेठ असलेल्या श्री सिध्दिविनायक मंदिरातुन दुपारी बारा ते दोनच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव असलेलीं मूर्ती चोरीला गेली. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्ती चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी तात्काळ लष्कर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला .
लष्कर पोलिसांनी मंदिरातील सी. सी.टी. व्ही. फुटेज तपासले असता , मूर्ती चोरी करतानाचे फुटेज मिळाले . हे फुटेज पोलिसांनी सर्व ठिकाणी पाठविले . त्यानंतर लष्कर पोलिसांची गुन्हे शाखेची पथके बाजारपेठेत , रेल्वेस्थानक आदी भागात तपासासाठी रवाना झाली.पुणे रेल्वे स्थानकावर फुटेज मधील संशयास्पद व्यक्ती आढळली. लष्कर पोलीस ठाण्याचे ए. पी. आय. सुनिल गाडे व कॉन्स्टेबल शिरगिरे यांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे त्याच्याकडे तीच गणेशाची पंचधातूची आढळली . लष्कर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय विठ्ठल साळुंके व डी. बी . स्टाफ यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यात आला .याबाबत दत्त समाज तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी समाधान व्यक्त केले असून गणेशाच्या आशिर्वादामुळेच मूर्ती परत मिळाल्याचे सांगितले.