मंदिरात चोरी
By Admin | Published: October 30, 2014 11:01 PM2014-10-30T23:01:13+5:302014-10-30T23:01:13+5:30
सावरदरी (ता.खेड) येथील ग्रामदैवत गोंधळजाई देवीच्या मंदिरात काल रात्नीच्या सुमारास चोरटय़ांनी हजारो रुपये किमतीचे पितळी वस्तू आणि दानपेटी लंपास केली.
आंबेठाण : सावरदरी (ता.खेड) येथील ग्रामदैवत गोंधळजाई देवीच्या मंदिरात काल रात्नीच्या सुमारास चोरटय़ांनी हजारो रुपये किमतीचे पितळी वस्तू आणि दानपेटी लंपास केली.
गावात प्रथमच घडलेल्या या घटनेने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. परिसरात असणा:या भंगार दुकान चालकांवर नागरिक संशय व्यक्त करीत आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मधील सावरदरी हे महत्वाचे गाव आहे. गावात प्रवेश करण्याअगोदर ग्रामदैवत असणा:या गोंधळजाई देवीचे मंदिर आहे. नेहमीप्रमाणो ग्रामस्थ सकाळी दशर्नासाठी मंदिरात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या वेळी मंदिरात असणारी दानपेटी देखील चोरटय़ांनी याप्रसंगी लंपास केली. ही चोरी करताना गाभा:यात लटकवलेली घंटेची दोरी कापण्यात आली असून इतर ठिकाणी असणा-या साखळ्याच्या कड्या उचकटून घंटा चोरी करण्यात आल्या. या घटनेचा नागरिकांनी निषेध केला असून या चोरटय़ाचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे. (वार्ताहर)
4या चोरीत महादेवाच्या पिंडीवर असणारी एक ते दीड किलो वजनाची तांब्याची कळशी. अंदाजे दीड किलो वजनाच्या 3 मोठय़ा पितळी समई, तसेच 2 लहान पितळी समई, जवळपास 13 ते 14 किलो वजनाच्या तीन मोठय़ा पितळी घंटा, आणि अंदाजे एक किलो वजनाच्या जवळपास 2क् पितळी घंटा या प्रसंगी चोरी झाल्या आहे.