अखिल भारतीय सेनेचे रास्ता रोको
By admin | Published: June 10, 2017 01:59 AM2017-06-10T01:59:02+5:302017-06-10T01:59:02+5:30
समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.८) इंदापूरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.८) इंदापूरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
शहरात सुरू असणारे महामार्ग विस्तारीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. ते काम करणाऱ्या गँगसन इंडिया प्रा. लि. या संस्थेला काळ्या यादीत टाकावे, कंपनी व शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
यावेळी अखिल भारतीय सेनेचे तालुका युवकचे अध्यक्ष शुभम
पवार, उपाध्यक्ष पवन सूर्यवंशी,
मंथन पवार, केदार जाधव, बबलू सोनवणे, नीलेश बनसोडे, तेजस सूर्यवंशी, अझरुद्दीन सय्यद, स्वप्निल साबळे, आकाश सावंत, प्रवीण गायकवाड, शेखर जाधव, वाजिद पठाण, अक्षय व्यवहारे, सुजय
व्यवहारे, आकाश पेटकर, नितीन आरडे, केशवराव लोखंडे, किरण
भोंगा व इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. मंडलाधिकारी संतोष अनगरे, पोलीस ठाण्याच्या वतीने विनोद पवार यांनी निवेदन स्वीकारले.