न्यायालयाच्या आदेशाचा अवमान थांबवून एसटी कामगारांचे वेतन त्वरित द्या, एसटी कामगार संघर्ष युनियनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:39+5:302021-09-04T04:13:39+5:30

याबाबतचे निवेदन एसटी कामगार संघर्ष युनियनचे माने यांनी राजगुरुनगर आगारप्रमुखांना दिले आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मे २०२१ ...

Stop the contempt of court order and pay the wages of ST workers immediately, demands of ST workers struggle union | न्यायालयाच्या आदेशाचा अवमान थांबवून एसटी कामगारांचे वेतन त्वरित द्या, एसटी कामगार संघर्ष युनियनची मागणी

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान थांबवून एसटी कामगारांचे वेतन त्वरित द्या, एसटी कामगार संघर्ष युनियनची मागणी

Next

याबाबतचे निवेदन एसटी कामगार संघर्ष युनियनचे माने यांनी राजगुरुनगर आगारप्रमुखांना दिले आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मे २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांना नियत तारखेला वेतन मिळत नाही. तसेच जुलै २०२१ चे वेतन औद्योगिक न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात (दि. १४) दिलेल्या आदेश देऊनही अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना दिले नाही. तसेच ऑगस्ट २०२१ महिन्याचेही वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

याबाबतीत महामंडळाचे लक्ष वेधण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या राजगुरुनगर आगारासमोर निदर्शने करण्याचे निवेदन दिले होते. परंतु, पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार सध्याच्या कोवीड परिस्थितीत निदर्शने करू नयेत, यामुळे केवळ निवेदन देऊन कामगारांची मागणी आपल्यापर्यंत पोहोचवीत आहोत. महामंडळ आणि संबंधितांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असेही निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

निवेदन देताना माने यांचे समवेत अशोक शेगडे, जालिंदर पोटे, तुकाराम शिरसाठ, मंगेश शिंगाडे, विलास जाधव, सोमा भोर, किरण वाघचौरे आदी एसटी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Stop the contempt of court order and pay the wages of ST workers immediately, demands of ST workers struggle union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.