कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीचा रास्ता रोको

By admin | Published: May 19, 2017 01:33 PM2017-05-19T13:33:28+5:302017-05-19T13:33:28+5:30

पिंपरी सांडस कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीच्या वतीने वाघोली येथे पुणे -अ.नगर महामार्गावर प्रतिकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the path to the Anti-Garbage Dispute Committee | कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीचा रास्ता रोको

कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीचा रास्ता रोको

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19 -  पिंपरी सांडस कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीच्या वतीने वाघोली येथे पुणे -अ.नगर महामार्गावर प्रतिकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुणे शहराचा कचरा ग्रामीण भागात कुठेही होऊ देणार नसल्याचा निर्धार पूर्व हवेलीतील जनतेने केला. 
 
सर्वपक्षीय आजी माजी पदाधिकारी सर्व पक्षीय आजी माजी स्थानिक लोकप्रतिनिधी विविध गावातील स्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. 
 
हवेलीचे तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत शासनाचा व पालकमंत्र्यांचा निषेध करून अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. शासनाने फेरविचार न केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात होईल, असा इशारा देण्यात आला.

Web Title: Stop the path to the Anti-Garbage Dispute Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.