पाण्यासाठी शेतकऱ्यांचा वडापुरीत रास्ता रोको

By Admin | Published: November 26, 2015 12:54 AM2015-11-26T00:54:34+5:302015-11-26T00:54:34+5:30

वडापुरी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. २५) शेतीच्या पाण्यासाठी इंदापूर-अकलुज रस्त्यावर अवसरी येथील फाटा क्र ५९ ला शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळावे

Stop the path of farmers' farming for water | पाण्यासाठी शेतकऱ्यांचा वडापुरीत रास्ता रोको

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा वडापुरीत रास्ता रोको

googlenewsNext

वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. २५) शेतीच्या पाण्यासाठी इंदापूर-अकलुज रस्त्यावर अवसरी येथील फाटा क्र ५९ ला शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी या भागातील हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
या वेळी दत्तात्रय शिर्के, सुरेश मेहेर, नारायण नलवडे, राजेंद्र नलवडे, बाळासाहेब नलवडे, ज्ञानदेव शिंदे, पद्माकर फडतरे, महेश बोधले, संतोष देशमुख, महेश शिर्के, विक्रम चंदनशिवे, साहेबराव चंदनशिवे, विलास सावंत, नंदु फडतरे, पांडूरंग देवकर, सलीम पठाण, धनंजय फडतरे, बबन फडतरे, आदी हजारो शतकरी उपस्थित होते. दत्तात्रय शिर्के, महेश बोधले, पांडुरंग देवकर यांची भाषणे झाले. या वेळी ते म्हणाले, सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. आलेले उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहे. वेळोवेळी पाटबंधारे विभाग यांना विनंती करून सुद्धा पाणी देत नसेल तर आलेले पीक सुद्धा जळून जाणार आहेत. जर पाणी मिळाले नाही तर आणखी तीव्र रास्ता रोखो या ठिकाणी करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिल्याने पाटबंधारे खात्याला जाग आली. या आंदोलनानंतर पाणी सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली.
वडापुरी परिसरातील अवसरी, पंधारवाडी, वडापुरी, शेटफळ हवेली या भागातील शेतकऱ्यांनी दि २१/११/१५ रोजी निरा डावा कालवा फाटा क्र. ५९ अवसरी शाखेद्वारे क्र १ ते ६ वरील लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडावे, म्हणून गेली तीन महिन्यापासून पाटबंधारे विभागा कडे मागणी करीत आह.े परंतु या फाटा क्र ५९ अवसरी ब्रँचला पाणी न सोडता दुसरी कडे पाणी सोडले.
जो पर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले. या खात्याचे बारामती उपविभाग येथील एस. जी. चौलंग, शाखाधिकारी बारामती पाटंबधारे तसेच बावडा येथील विलास गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. ते म्हणाले, येत्या दोन दिवसात या ५९ फाटयाला ४० क्युसेस ने पाणी सोडले जाईल. टेल टु हेड (खालून वर पर्यंत ) सोडून भरणे काढले जाईल, असे अश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Stop the path of farmers' farming for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.