अवैध धंंद्यांच्याविरोधात झारगडवाडीत रास्ता रोको
By Admin | Published: June 20, 2017 07:15 AM2017-06-20T07:15:18+5:302017-06-20T07:15:18+5:30
झारगडवाडी (ता. बारामती) येथे अवैध धंद्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या महिलांचा आक्रोश थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोर्लेवाडी : झारगडवाडी (ता. बारामती) येथे अवैध धंद्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या महिलांचा आक्रोश थांबविण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढाकार व्यक्त केला आहे. अवैध धंद्याच्या विरोधात आंदोलनाचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.त्यापैकी आज झारगडवाडी येथे आज बारामती सोनगाव- वालचंदनगर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या मध्ये विशेषता: महिलांचा खूप मोठ्या प्रमणावर सहभाग होता.
गेल्या अनेक वषार्पासुन गावात अनेक ताडी, दारु, हातभट्टी, मटका धंदा सुरु आहे. त्यात आता वेश्याव्यवसाय ही खुले आम सुरु झाला आहे. या विषयी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी देण्यात आल्या. मात्र, तात्पुरत्या जुजबी कारवाई मुळे अवैध धंदे उघडपणे सुरुच होते. शेवटी ग्रामस्थांनी बैठक घेउन सलग सात दिवस आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. यात रास्ता रोको , पोलीसांना बांगड्यांचा आहेर, मुख्यमंत्र्यांचा मुखवटा घालुन दारु विक्री करणे, तहसिल कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण, अशी अनेक आंदोलने करण्याच्या निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे .
त्यापैकी आज केलेल्या रास्तारोको आंदोलनात महिलांचा खूप मोठ्या प्रमणावर सहभाग होता.शिवाय ग्रामस्थ,तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण झारगडवाडी हि आज रस्त्यावर उतरली होती. यावेळी अवैध धंद्याविरोधात संतप्त भावना ग्रामस्थांनी, महिलांनी व्यक्त केल्या. आंदोलनानंतर अवैध धंदे बंद न झाल्यास परिणाम खूप वाईट होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या घरी जाऊन सर्व ग्रामस्थांनी समज दिली .यावेळी संपूर्ण गावातून मोर्चा काढण्यात आला.
मद्यपींची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला.पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड व पोलीस उपनिरीक्षक छबू बेरड यांनी ग्रामस्थांनां अवैध धंदे आढळल्यास कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली. या मोर्चा साठी बाहेरील गावामधील पुढारी, नेते, अधिकारी वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता