डोर्लेवाडी येथे दूध, ऊस दरासाठी रास्ता रोको

By admin | Published: December 9, 2014 12:07 AM2014-12-09T00:07:14+5:302014-12-09T00:07:14+5:30

बारामतीतील डोर्लेवाडी येथे दूध व ऊस दराबाबत शेतक:यांनी बारामती-सोनगाव रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको केला.

Stop the road for milk and sugarcane prices at Dorlawadi | डोर्लेवाडी येथे दूध, ऊस दरासाठी रास्ता रोको

डोर्लेवाडी येथे दूध, ऊस दरासाठी रास्ता रोको

Next
डोर्लेवाडी : बारामतीतील डोर्लेवाडी येथे दूध व ऊस दराबाबत शेतक:यांनी बारामती-सोनगाव रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको केला. 
पोलीस निरीक्षक सज्रेराव पाटील व सहायक निरीक्षक डी. बी. भोसले यांनी निवेदन स्वीकारले.  केंद्र व राज्य सरकारांनी दूध पावडरची निर्यात बंद केल्यामुळे दुधाच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतक:यांचे  मोठे नुकसान होत आहे. 
सध्या शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने दूध व ऊस दराबाबत ठोस पाऊल उचलले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.  
या वेळी पंचायत समिती सदस्या डॉ. प्रतिभा नेवसे, छत्रपती कारखान्याचे संचालक अशोक नवले, डोर्लेवाडीच्या सरपंच प्रियांका निलाखे, उपसरपंच विनोद नवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश काळकुटे, दत्ता नवले, निवृत्ती नेवसे, रमेश मासाळ, नितीन मासाळ, दत्तात्रय मासाळ, सोमनाथ नाळे आदी शेतकरी या रास्ता रोकोत सहभागी झाले होते. (वार्ताहर)

 

Web Title: Stop the road for milk and sugarcane prices at Dorlawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.