नीरा-बारामती मार्गावर रास्ता रोको, एक तास आंदोलन, निकृष्ट रस्त्यांमुळे ग्रामस्थांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:59 PM2017-09-18T23:59:47+5:302017-09-19T00:00:03+5:30

को-हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नीरा डावा कालव्याच्या पलिकडील रहिवाशांना अलिकडे गावठाणाकडे येण्यासाठी पक्का रस्ता तयार व्हावा या मागणीसाठी येथील स्थानिक नागरिक व भाजप तालुका पदाधिका-यांनी नीरा-बारामती मार्गावर एक तास रस्ता रोको आंदोलन केले.

 Stop the road on the Nira-Baramati road, an hour-long agitation, disadvantages of villagers due to inclement roads | नीरा-बारामती मार्गावर रास्ता रोको, एक तास आंदोलन, निकृष्ट रस्त्यांमुळे ग्रामस्थांची होतेय गैरसोय

नीरा-बारामती मार्गावर रास्ता रोको, एक तास आंदोलन, निकृष्ट रस्त्यांमुळे ग्रामस्थांची होतेय गैरसोय

Next


वडगाव निंबाळकर : को-हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नीरा डावा कालव्याच्या पलिकडील रहिवाशांना अलिकडे गावठाणाकडे येण्यासाठी पक्का रस्ता तयार व्हावा या मागणीसाठी येथील स्थानिक नागरिक व भाजप तालुका पदाधिका-यांनी नीरा-बारामती मार्गावर एक तास रस्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी अधिका-यांनी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन थांबवण्यात आले.
एक तासाहुन अधिक वेळ नीरा बारामती मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे अधिकार असलेल्या अधिकाºयांनी उपस्थित राहुन प्रत्यक्ष पहाणी केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. यामुळे रस्त्याची पहाणी व निवेदन स्वीकारण्यासाठी बारामती पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे, मंडलअधिकारी उदय कदम, वडगाव पाटबंदारे विभागाचे शाखाधिकारी एस. एम. बनकर उपस्थित होते. येथील नीरा डावा कालव्यापलीकडील लव्हेवस्ती, खोमणेवस्ती, बरकडेवस्ती, लोहारमळा या भागात सुमारे एक ते दीड हजार लोकवस्ती आहे. त्यांना गावठाणकडे येण्यासाठी रस्ता चांगला नाही. सध्याच्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. यामधे पाणी साचले आहे. यामुळे रहदारी लायक राहीला नाही. दीड किलोमिटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कालव्यावरील पालथ्या मोरीतून परवनागी नसतानाही नागरिकांना प्रवास करावा लागतो.
यामधे पावसाचे पाणी व कालव्यातील गळतीचे पाणी साचल्याने प्रवास धोकादायक होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानीक ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे नागरीकांनी पाठपुरावा करूनही काही फायदा झाला नाही.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण आटोळे, माणिक काळे, सुनिल माने, युवराज तावरे, पप्पू मासाळ, संदिप चोपडे, प्रशांत लव्हे, किशोर मासाळ, पिंटु लोखंडे, जमिर शेख, पोपट चव्हाण, अजित लोखंडे, जहिद शेख, युवराज तावरे, प्रमोद तावरे, सतिश फाळके, ग्रामविकास अधिकारी प्रकाश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.
>वालचंदनगर-कळंब रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना तसेच दुचाकीधारकांना कसरत करीत या रस्त्यावरून जावे लागत आहे. वालचंदनगर-कळंब रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांसाठी धोेकादायक बनलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने प्रवाशांना धोकादायक ठरत आहे. रस्त्याची रुंदी कमी व वाहतूक जास्तीत जास्त असल्याने दुसºया वाहनाला साइड देताना अनेक वेळा वाहने चारीत गेलेली आहेत. महामंडळाच्या एसटी बसेस रुतल्याने तासन्तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. कळंब येथे वालचंद विद्यालय, फडतरे नॉलेज सिटी व रनसिंग महाविद्यालय असल्यामुळे हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून दररोज
पायी व सायकलवरून ये-जा
करीत असतात.रस्ता अरुंद व खड्ड्याचा धुमाकूळ असल्याने विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत दररोज करावी लागत आहे. हा रस्ता वेळेत दुरुस्त न केल्यास नाहक विद्यार्थ्यांना मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याचे येथील नागरिकांतून बोलले जात आहे.
>यापूर्वीही आंदोलन : प्रशासन सुस्त
रस्त्याच्या प्रश्नासाठी यापुर्वी २९ आॅगष्ट २००९ रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. पण यावेळी फक्त आश्वासने दिली पुढे काहीच झाले नाही. आपल्यावर जाणीवपुर्वक अन्याय होत असल्याने येथील नागरीकांनी भाजपा कार्यकर्ते प्रशांत सातव यांच्याशी संपर्क साधुन आपल्या व्यथा मांडल्या स्थानिक प्रशासनाच्या कारभाराविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले. तालुका भाजप पदाधिकारी व स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.
>...तर आंदोलन तीव्र करू
यावेळी सातव म्हणाले की बारामतीचा विकासाच्या केवळ वल्गणा केल्या जात आहेत. गेल्या अनेक वषार्पासुन सत्ताधाºयांनी येथील नागरीकांची मते घेतली पण कामे केली नाहीत. यापुढे असे चालणार नाही. रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आंदोलन तीव्र करू राज्य पातळीवरून कामाला मंजुरी आणण्याचे प्रयत्न होतील. कालव्यावर पूल बांधावा, रस्त्या नव्याने तयार करावा. स्मशानभुमिला कंपाऊंड करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
- प्रशांत सातव, कार्यकर्ता, भाजपा

 

Web Title:  Stop the road on the Nira-Baramati road, an hour-long agitation, disadvantages of villagers due to inclement roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.