सासवड येथे रास्ता रोको
By admin | Published: January 10, 2017 02:27 AM2017-01-10T02:27:34+5:302017-01-10T02:27:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फसलेले नोटाबंदी धोरण व त्यामुळे सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना झालेला मनस्ताप यांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे
सासवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फसलेले नोटाबंदी धोरण व त्यामुळे सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना झालेला मनस्ताप यांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सासवड येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, जिल्हा बँकेत पैसे नाहीत त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे व आता सरकार महिलांच्या दागिन्यांवर लक्ष ठेवून आहे.
याविरुद्ध हे आंदोलन असून, न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. भाजपाच्या मंत्र्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
या वेळी तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सारिका इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, अशोक ओव्हाळ, विजय कोलते, अशोक टेकवडे, बबूसाहेब माहूरकर, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, डॉ. दगडे, दत्ता चव्हाण, बंडूकाका जगताप, संतोष जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रास्ता रोकोनंतर आंदोलक आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बंद असलेल्या एटीएम मशीनला हार घातले. (वार्ताहर)