खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्णांची लूट थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:39+5:302021-05-25T04:11:39+5:30
कोरोनाचे मोठे संकट असून तालुक्यातही रुग्णाची संख्या मोठी आहे. तालुक्यात ४० पेक्षा जास्त खासगी रुग्णालयांना शासनाने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार ...
कोरोनाचे मोठे संकट असून तालुक्यातही रुग्णाची संख्या मोठी आहे. तालुक्यात ४० पेक्षा जास्त खासगी रुग्णालयांना शासनाने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार कारण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जास्त बिले आकारली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा बिल आकारणी केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांची बिलापोटी मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. कोरोनाकाळात रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिल संदर्भात रुग्णालयांची चौकशी करावी, लेखा परीक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ शासनाला अहवाल सादर करावा, शासनाने ठेवून दिलेले उपचार खर्चाचे दरपत्रक व लेखापरीक्षण अधिकारी नाव, हुद्दा, मोबाईल क्र. आदी माहिती दवाखान्याच्या दर्शनी भागात फलकावर लावावी, अशी मागणी समर्थ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यात ४० रुग्णालये कोविडवर उपचार करीत आहेत. मात्र, काही रुणालयाने रुग्णांकडून वाढीव बिले लावून लूट करीत आहेत. याच्या अनेक तक्रारी आहेत. रुग्णभरती करतेवेळी पैशाची मागणी करतात. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक बिले लावून लूट करीत आहेत. पक्की बिले दिली जात नाहीत. रुग्णांची पिळवणूक थांबवावी, असे समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे-पाटील यांनी सांगितले.
२४ राजगुरुनगर निवेदन
राजगुरुनगर येथे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देताना विजयसिंह शिंदे पाटील व इतर.