वालचंदनगरला रास्ता रोको
By admin | Published: July 2, 2017 02:10 AM2017-07-02T02:10:40+5:302017-07-02T02:10:40+5:30
जंक्शन (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : जंक्शन (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला. भजनावळे हे खोटे व परस्पर गुन्हे नोंदवत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
जंक्शन चौकात दोन
तास रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी यावेळी दोन तास रस्ता रोको केले. बारामती-इंदापूर मुख्य रस्त्यासह व कळस
वालचंदनगर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यावेळी येत्या सोमवारी (दि.३) इंदापूर
तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. न्हावी गावचे रहीवाशी सागर लोंढे पत्नी सोनाली लोंढे व आतिश मिसाळ यांच्यासह जंक्शन येथील मुख्य चौकात सात दिवस उपोषणास
बसले होते.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्यात आले. आंदोलन ठिकाणी बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी बापू बांगर यांनी भेट दिली. पोलीस यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महादेव मिसाळ, रत्नाकर मखरे, अतिश मिसाळ, अॅड. बापू साबळे, अॅड. राहुल मखरे, नेताजी लोंढे, शरद चितारे, महेश लोंढे, गुलाब वाघमोडे, श्रीपती चव्हाण, सूरज मनसावले आदींची भाषणे झाली.
आंदोलन ठिकाणी पोलीस निरीक्षक सुरेशसिंह दौंड, गजानन गजभारे, यांच्यासह फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.