पुलाचे काम थांबल्याने अपघाताचा धोका
By Admin | Published: May 20, 2016 02:17 AM2016-05-20T02:17:50+5:302016-05-20T02:17:50+5:30
पुलाचे काम थांबल्याने भविष्यात ओढ्याला पूर आल्यास आजुबाजूच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
यवत : यवत स्टेशन परिसरात जुना कालव्याच्या वरील पुलाचे काम थांबल्याने भविष्यात ओढ्याला पूर आल्यास आजुबाजूच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या वर्षी नुकतीच कालव्यातून दौड़ व हवेली तालुक्यातील शेतीला पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु जुन्या कालव्यातून पाणी सोडत असताना काही ठिकाणी नव्याने पूल बांधण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी कालव्याच्या पात्राचा प्रवाह बदलून तात्पुरत्या स्वरुपात कालवा बाजूने सुरु करण्यात आला आहे.
ओढा बंद राहिल्यास पावसाचे पाणी पुढे जाणार तरी कसे हा प्रश्न आहे. भुलेश्वर परिसरात मोठा पाऊस झाल्यास डोंगराळ भागातील वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणावर या ओढयात वाहून येत असते.पावसाळा काही दिवसांवर आलेला असताना पाटबंधारे विभागाने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते याचे भान पाटबंधारे विभागाला राहिलेले नाही. सद्य परिस्थितीत यावर काय उपाय योजना करणार याचे कसलीही उत्तर अधिकारी देत नाही.
>यवत रेल्वे स्टेशन नजिक कालव्याला ओढा ओलांडत असल्याने या ठिकाणी कालव्याचे पात्र बदलून त्या ठिकाणी नविन पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे.मात्र पुलाचे काम अर्धवट परिस्थितीत बंद करण्यात आले आहे.सद्य परिस्थितीत कालव्यातून पाणी वाहात आहे.कालव्याच्या भरावामुळे ओढ्याचे पात्र पुर्णत: बंद झाले आहे.