काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने पुण्यात कथा आणि व्यथाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:28+5:302021-08-28T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी दिल्लीहून जाहीर झाली आणि त्यातल्या पुण्यामधील नियुक्त्यांनी एकाच वेळी आनंद आणि ...

Stories and sorrows in Pune by the Congress state executive | काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने पुण्यात कथा आणि व्यथाही

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने पुण्यात कथा आणि व्यथाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी दिल्लीहून जाहीर झाली आणि त्यातल्या पुण्यामधील नियुक्त्यांनी एकाच वेळी आनंद आणि निराशाही निर्माण झाली.

रमेश बागवे यांचे शहराध्यक्षपद कायम राहिले म्हणून त्यांनी आजच लगेच ब्लॉक बैठका घेण्यास सुरुवात केली, तर त्या पदासाठी इच्छुक असलेल्या आजी-माजी नगरसेवकांनी खासगीत नाराजी जाहीर करण्यास सुरुवात केली. बैठकीकडे अर्थातच पाठ फिरवली.

प्रदेश प्रवक्ता पदावर असलेल्या गोपाळ तिवारी यांना प्रदेश सचिव करण्यात आले. त्यांनी पक्षाच्या ‘व्हाॅट्सअप’ ग्रुपवर ही तर पदावनती आहे, असे म्हणत पद स्वीकारण्यास नकार दिला. याच पदावर महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी फेसबुकसह सगळ्या समाज माध्यमांवर थेट सोनिया गांधी, राहुल गांधींपासून सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले.

प्रदेश उपाध्यक्ष असलेले मोहन जोशी यांना कोणतेही पद नाही तर ॲॅड. अभय छाजेड यांना सरचिटणीस पदावर कायम ठेवण्यात आले. दोघेही माजी शहराध्यक्ष, बऱ्याच वर्षांचे अनुभवी, त्यामुळे अळीमिळी गुपचिळी असे शांत आहेत, पण त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की, ही गोष्ट झाली तरी कशी? उल्हास पवार हेही आता सांगेन गोष्टी युक्तीच्या चारसारखे आहेत, पण त्यांनाही स्थान मिळाले, त्यामुळे ते समाधानी तर का जागा अडवता ही त्यांच्या नियुक्तीवरची त्यांच्या इतक्याच काही ज्येष्ठांची प्रतिक्रिया.

माजी आमदार अनंत गाडगीळ प्रवक्तेपदी आरूढ झाले, पण ते पुण्याचे कसे काय असा प्रश्न त्यांच्या मुंबईतील रहिवासावरून नाही तर, पुण्यातील सततच्या गैरहजेरीवरून विचारला जात आहे. मागची सलग पाच वर्षे काँग्रेसभवनची पायरीही न चढता प्रदेश कार्यकारिणीत ‘आपटी’ न खाता ‘जीत’ राहिलेल्या आणखी एका नियुक्तीचीही जोरदार चर्चा काँग्रेस भवनात आहे.

Web Title: Stories and sorrows in Pune by the Congress state executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.