किरकोळ वादातून दोन गुन्हेगारांच्या गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:08 AM2021-05-24T04:08:54+5:302021-05-24T04:08:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून दोन गुन्हेगारांच्या गटात झालेल्या वादानंतर झालेल्या हाणामारीत २ तरुण गंभीर जखमी झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ कारणावरून दोन गुन्हेगारांच्या गटात झालेल्या वादानंतर झालेल्या हाणामारीत २ तरुण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटावर खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
दुसऱ्या गटातील तरुणाबरोबर फिरत असल्याचा राग मनामध्ये धरून टोळक्याने तरुणावर काेयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना भवानी पेठेतील कासेवाडीत शनिवारी मध्यरात्री ३ वाजता झाली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार योगेश मारुती गायकवाड, विशाल मारुती गायकवाड, इटली ऊर्फ अशोक गायकवाड, इशार शेख, सलीम (वय रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसिफ बाबूलाल शेख (वय २२, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी सराईत नझीर सलीम शेख, जिलानी सलीम शेख, इरफान पटेल, मुनीर गौस शेख (सर्व रा. कासेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश मारुती गायकवाड (वय २५) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ तपास करीत आहेत