इंदापूरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान; वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 01:12 PM2023-04-14T13:12:54+5:302023-04-14T13:15:30+5:30

निमगाव केतकी येथील पाटील वस्ती येथे वीज कोसळून एका शेतकर्‍याची दुभती गाय जागीच ठार

Stormy rains damage crops in Indapur Electricity supply interrupted overnight due to falling power poles | इंदापूरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान; वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित

इंदापूरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान; वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित

googlenewsNext

निमगाव केतकी: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी गुरुवार (दि.१३) रोजी रात्री नऊ वाजता वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांचा कडकडाट व वादळी वार्‍यात निमगाव केतकी येथील पाटील वस्ती येथे वीज कोसळून एका शेतकर्‍याची दुभती गाय जागीच ठार झाली. तर शेंडे मळा येथे झाडावर वीज कोसळली मात्र यात कुठलीही हानी झाली नाही.

वादळी वारा, मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चारा पिकांचे तसेच तरकारी, भाजीपाला व फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. जांभूळ, द्राक्ष, आंब्यांच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे कोसळून तसेच वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता. शेतकर्‍यांनी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

निमगाव केतकी येथील मदन कांतीलाल पाटील यांनी त्यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या दुभत्या गायीच्या अंगावर गुरुवारी रात्री ९.३० वाजता वीज कोसळून दुभती गाय जागीच ठार झाली. मदन पाटील यांनी एक लाख पन्नास हजाराची गाय खरेदी केली होती. सकाळी व सायंकाळी मिळून २० लिटर दूध देणारी गायच ठार झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती काकडे व पशु पर्यवेक्षक अधिकारी डॉ. अशोक काळे यांनी मृत गायचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठवला. निमगाव केतकी येथील गाव कामगार तलाठी गोरक्ष इंगळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

एकाच वेळी दोन ठिकाणी  कोसळली वीज

मागील चार वर्षाच्या काळात या वस्तीवर पाच वेळा वीज कोसळली असून यामध्ये एका मुलाचा मृत्यू देखील झाला होता. त्याचबरोबर जनावरेही दगावली आहेत. या भागात वारंवार वीज कोसळत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेत वीज निवारक यंत्र बसवावे. - तात्यासाहेब वडापुरे, ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी

Web Title: Stormy rains damage crops in Indapur Electricity supply interrupted overnight due to falling power poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.