रंगतदार आखाड्याने भोसरी यात्रेची सांगता
By admin | Published: April 26, 2016 02:13 AM2016-04-26T02:13:00+5:302016-04-26T02:13:00+5:30
कुस्त्या केल्याबद्दल भोसरीकरांनी केलेली बक्षिसांची लयलूट यामुळे पैलवानांच्या भोसरीने रंगतदार आखाडा भरवून भैरवनाथ यात्रेची सांगता केली.
भोसरी : बलाढ्य मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी जमलेली गर्दी, प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल अशा रोमहर्षक कुस्त्या आणि पैलवानांना निकाली कुस्त्या केल्याबद्दल भोसरीकरांनी केलेली बक्षिसांची लयलूट यामुळे पैलवानांच्या भोसरीने रंगतदार आखाडा भरवून भैरवनाथ यात्रेची सांगता केली.
कुस्तीशौकिनांनी आखाडा फुलून गेला होता. दुपारी चारपासून कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. या वेळी १०० रुपयांपासून एक लाख रुपयांच्या कुस्त्या पाहावयास मिळाल्या. आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, नगरसेवक वसंत लोंढे, नितीन लांडगे, जालिंदर शिंदे, भानुदास फुगे, पंडित गवळी, शहर कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पोपट फुगे, राहुल गवळी, हनुमंत गावडे, बाळासाहेब गव्हाणे, सुरेश लोंढे, सीताराम लांडगे, पांडुरंग गवळी, श्यामराव फुगे, पै. गणपत गव्हाणे, हिरामण लांडगे, बाळासाहेब लांडगे, सुनील गव्हाणे, किसनराव शिंदे, रंगनाथ फुगे, शिवाजी लांडगे, बाजीराव लांडे, विनय लांडगे, विजय फुगे आदी उपस्थित होते. युवा कार्यकर्ते शेखर लांडगे, नारायण लांडगे, विनायक माने यांनी निवेदन केले. (वार्ताहर)