कथा हा लोकप्रिय साहित्यप्रकार
By admin | Published: November 22, 2014 11:47 PM2014-11-22T23:47:32+5:302014-11-22T23:47:32+5:30
लोकप्रिय आणि अभिजात साहित्य प्रकार म्हणजे कथा. अनादी काळापासून कथेचे मानवाला आकर्षण आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
Next
पुणो : लोकप्रिय आणि अभिजात साहित्य प्रकार म्हणजे कथा. अनादी काळापासून कथेचे मानवाला आकर्षण आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
भाषा फाउंडेशन या मराठी भाषेचे संवर्धन करणा:या संस्थेने आयोजित केलेल्या तीन दिवसीय ‘कथायात्र’ या महोत्सवाचे उद्घाटन आज दीपप्रज्वलनाने झाले. साहित्यिक फ्रान्सिस दिब्रीटो, अमेरिकेतील आर्ची कॉमिक्सच्या संचालक नॅन्सी सिल्व्हरक्रीक, फिल्म सिटीचे माजी संचालक लक्ष्मीकांत देशमुख, भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे व्यासपीठावर होते. कथक नर्तिकांनी विविध रसांवर सादर केलेल्या अदाकारीने कार्यक्रम सुरू झाला.
कर्णिक म्हणाले, ‘‘कथा या वा्मयप्रकाराचे सामथ्र्य ओळखून भाषा फाउंडेशनने भाषा मूल्यांची जोपासना महाराष्ट्रात चालविली आहे. साहित्याने समाज बांधला जातो. हा देश अखंड ठेवण्याचे कार्य कथेनेच केले. रामायण, महाभारत या महाकथानकामुळे सारे प्रांत एकत्र राहिले.’’ स्वाती राजे यांनी प्रास्तविक केले. (प्रतिनिधी)
4महाराष्ट्रात अजून बरीच जमीन आसुसलेली आहे. बरीच जमीन नांगरायची आहे. संत नामदेवांचे स्मरण येथेही करता येईल, अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी घुमान (पंजाब) येथील नियोजित साहित्य संमेलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
4कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्वतंत्र चुलीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘कोकणची अस्मिता आहे, तेथील साहित्यिकांना स्वतंत्रपणो काम करू देणो ही सभ्यता आहे.’’