धनगर समाजाची ताकद कुल यांच्या पाठीशी

By admin | Published: October 11, 2014 11:41 PM2014-10-11T23:41:32+5:302014-10-11T23:41:32+5:30

बारामती येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक सूतोवाच केले. त्यामुळे धनगर आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.

The strength of the Dhangar community is to support Kulay | धनगर समाजाची ताकद कुल यांच्या पाठीशी

धनगर समाजाची ताकद कुल यांच्या पाठीशी

Next
>यवत : बारामती येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक सूतोवाच केले. त्यामुळे धनगर आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. धनगर समाजाच्या आरक्षण लढय़ात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी दिलेल्या योगदानामुळे तालुक्यातील धनगर समाजाने कुल यांनाच मतदान करावे, असे आवाहन पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष हरीश खोमणो यांनी केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यभर आंदोलने व उपोषण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक टाळाटाळ करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला वेठीस धरले. तालुक्याच्या आमदारांनी शपथ घेऊन आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पाळले नाही. तसेच, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने धनगर आरक्षण कृती समितीशी ठोस चर्चा केली नाही. राहुल कुल यांनी आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, तर दिलाच शिवाय यापुढील काळात रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे जाहीर केले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीच्या सभेत धनगर समाजाबाबत राज्य सरकारने अन्याय केल्याचे सांगितले आणि आरक्षणाबाबत सकारात्मक सुतोवाच केले. धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ यांनी सर्व सदस्यांसह समाजाला विश्वास देऊन याच सभेमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी व काँग्रेसवर राग व्यक्त केला. त्यामुळे आता समाजातील नेत्यांनी, पदाधिका:यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी राहुल कुल यांच्या पाठीशी एकजुटीने ताकद उभी करावी, असे आवाहन खोमणो यांनी केले.
आरक्षणविरोधातील लढय़ावेळी बारामतीमध्ये सहा लाखांच्या आसपास धनगर समाज एकवटला. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी सरकारने आरक्षणविरोधी भूमिका घेतल्याने धनगर आरक्षण कृती समितीने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या विरोधातच काम करण्याची भूमिका घेतली व तसा जाहीर ठराव केला. (वार्ताहर)
 
माळी समाजाने कुल यांना मतदान करावे : भागवत
जिल्ह्यात माळी समाजाची संख्या मोठी असतानादेखील राष्ट्रवादी काँग्रेसने एकाही विधानसभा मतदार संघात माळी समाजाला उमेदवारी दिली नाही. आंबेगाव, पुरंदर, हडपसर येथे अनुक्रमे सुरेश गोरे, प्रा. दिगंबर दुगार्डे व वैशाली बनकर हे सक्षम उमेदवार असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.  दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांनी समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदावरून घालविण्यासाठीच्या अर्जावर पहिली सही केली होती. 
 
4खामगाव येथे काढलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यावेळी कुल म्हणाले, दौंड तालुक्याच्या विकासावर गप्पा मारणा:या आमदार रमेश थोरात यांनी ‘जाऊ तिथं खाऊ’ याप्रमाणो आपल्या जवळच्या नातेवाईक मंडळींना हताशी धरून केवळ नातलगांचा विकास केला. वाळू, मुरूममाफिया तसेच रस्त्यांच्या कामाबाबत ठेकेदारांचे हित जोपासून संपूर्ण तालुक्यात रस्त्याची दर्जाहीन कामे करण्यात येऊन जनतेच्या मतांवर आमदार झालेल्या जनतेचा विश्वासघात केला आहे. सध्या सत्ताधारी मंडळींकडे आमच्यावर टीका करण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही. म्हणून केवळ भीमा-पाटस कारखान्याचे राजकीय भांडवल केले जात आहे.
 
4पाटेठाण : राष्ट्रवादीचे सगळेच डाव आता संपुष्टात येऊ लागले आहेत. जनताच आता त्यांना धोबीपछाड डाव मतांच्या रूपातून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी व्यक्त केले.

Web Title: The strength of the Dhangar community is to support Kulay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.