पर्वती दर्शनमध्ये तणावपूर्ण शांतता

By admin | Published: July 9, 2015 03:20 AM2015-07-09T03:20:32+5:302015-07-09T04:41:12+5:30

पर्वती दर्शन येथे मंगळवारी दोन गटांत झालेल्या दगडफेक आणि मारामारीच्या प्रकारानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून, याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Stressful silence in mountain views | पर्वती दर्शनमध्ये तणावपूर्ण शांतता

पर्वती दर्शनमध्ये तणावपूर्ण शांतता

Next

पुणे : पर्वती दर्शन येथे मंगळवारी दोन गटांत झालेल्या दगडफेक आणि मारामारीच्या प्रकारानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून, याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटांतील एकूण १३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. दुचाकीचे पार्किंग करीत असताना, डोळ्यांवर हेडलाइटचा प्रकाशझोत पडल्यामुळे झालेल्या किरकोळ वादावादीमधून दोन गटांत दंगल उसळल्याचे रामानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रतेज महादेव सूर्यवंशी (वय २४), नवतेज महादेव सूर्यवंशी (वय १९), जावेद सलीम शेख (वय २१), मोहसीन आसीफ शेख (वय २०), सुभान अब्दुल रहमान कुरेशी (वय ४२), अफजल रईस अन्सारी (वय २०), शाहबाज अख्तर खान (वय २१), समीर मैनुद्दीन सय्यद (वय २०), नदीम सलीम नायब (वय २५, सर्व रा. पर्वती दर्शन) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल केला आहे.
आरोपींना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमध्ये दोन्ही गटांतील एकूण १२ जण जखमी झाले आहेत. यातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. एकूण ११ रिक्षा, २१ दुचाकी, ९ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)

महिलांच्या तक्रारींसाठी विशेष पथक
1सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी हवेमध्ये केलेला गोळीबार योग्यच होता. त्यांनी जर गोळीबार केला नसता, तर जमावाला नियंत्रित करणे शक्य झाले नसते. त्यामधून अनेकजण जखमी होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी शारीरिक हानी टळली. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता, असे सह आयुक्त सुनील रामानंद म्हणाले.
2ज्या महिलांनी आपल्याशी छेडछाड आणि अश्लील वर्तन झाल्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी महिला साह्य कक्षाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांचे एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाद्वारे या घटनांचा स्वतंत्र तपास करण्यात येत असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही रामानंद म्हणाले.
3शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहराची शांतता बिघडू देणार नाही. आतापर्यंत ‘बेसिक पोलिसिंग’द्वारे उत्तम कामगिरी करण्यात आली आहे. एमपीडीए अंतर्गत दोन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. आणखी दहा ते बारा गुन्हेगारांवर कारवाई होणार आहे, तर ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे.

Web Title: Stressful silence in mountain views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.