निर्देश न पाळणाऱ्यावर कडक कारवाई : रमा जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:08+5:302021-04-09T04:12:08+5:30
आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील, उपविभागीय दंडाधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप ...
आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील, उपविभागीय दंडाधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रमा जोशी, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये शासनाने दिलेल्या ब्रेक द चेन हा आदेश प्रभावीपणे अमलात आणण्याचा सल्ला देण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद राहून नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी गर्दी न करता भाजीपाला व्यापार करावा. रस्त्यावर भाजी विकण्यासाठी कोणीही बसू नये अथवा ग्रामपंचायतीनेेे निर्देशित केलेल्या जागेवरच भाजीपाला व्यापार करावा, शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल,दवाखाने वगळता सर्व आस्थापने बंद राहतील.
उपविभागीय दंडाधिकारी सारंग कोडलकर यांनी लग्नकार्य,दशक्रिया विधी, अंत्यविधी या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचे पोलीस पाटलांना आदेश दिले असून लग्नासाठी शासनाने निर्देशित केलेल्या ५० व्यक्ती ह्या कोरोना टेस्ट केलेल्या आहेत का नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
--
चौकट
संपर्कात आलेल्या व्यक्तीची टेस्ट आवश्यकच
तहसीलदार रमा जोशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लस घेण्याकरिता उत्स्फुर्त करून आपल्या गावामध्ये संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. मागील वर्षी कोरोना संसर्ग रुग्ण आढळला की ज्या प्रमाणे आपण त्या परिसरातील नागरिकांची पाहणी करून संपर्कात आलेल्या व्यक्तींची सुद्धा टेस्ट करून घेणे यासाठी प्रयत्न करावेत. काही नागरिक पॉझिटिव्ह आले असता घरीच राहण्याचे पसंत करतात. मात्र डॉक्टरचा लेखी सल्ला असल्याशिवाय त्यांना होमक्वारंटाईन करून देऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
पोलीस पाटील व प्रशासन चर्चेची ऑनलाईन बैठक हा पहिलाच उपक्रम असल्याचे पोलीस पाटील माधुरी जाधव यांनी सांगितले.