कोरोना नियम मोडल्यास कडक कारवाई : मयूर भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:52+5:302021-03-30T04:09:52+5:30
उपअधीक्षक भुजबळ म्हणाले की, शासनाने काही निर्बंध घातलेले असून याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, गेल्या मार्च महिन्या पेक्षा ...
उपअधीक्षक भुजबळ म्हणाले की, शासनाने काही निर्बंध घातलेले असून याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, गेल्या मार्च महिन्या पेक्षा सध्याच्या मार्च महिन्यात कोरोनाचे वाढते प्रमाण आहे. त्या दुष्टीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रात्रीची संचारबंदी असल्याने एकञीत फीरणाऱ्या व्यक्तीवर कडक धोरणा आवलंबविले जाईल. हॉटेल व्यवसायिकांनी राञी आठ वाजता हॉटेल बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या व्यतीरिक्त पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलच्या क्षमते नुसार निम्या पेक्षा कमी ग्राहक हॉटेलमध्ये असणे गरजेचे आहे.तेव्हा शासनाने ठरुन दिलेल्या नियमांचे पालन झाले पाहिजे. या व्यतिरिक्त शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ते नियोजन केले असून कुठल्याही परिस्थितीत गुंडगीरी खपवून घेतली जाणार नाही.
--
तर पोलीस फिर्यादी होतील
--
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोणच फिर्याद देण्यास येत नसेल तर आशा वेळी सामाजिक बांधिलकीतून आणि कायद्याला अनुसरुन पोलिसांनी फिर्यादी होणे तेवढेच महत्वाचे आहे . तेव्हा भविष्यात समाजहितासाठी पोलीस फिर्यादी होतील अशी माहितीही मयुर भुजबळ यांनी दिली
--