कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न दिल्यास कठोर कारवाई : सूरज मांढरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:25 PM2018-10-08T21:25:41+5:302018-10-08T21:28:26+5:30
जिल्हा परिषद प्रशासनात विविध संवगार्चे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर अदा करण्याची खातेप्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी व संस्था प्रमुख या नात्याने आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
पुणे : जिल्हा परिषदेच्या हजारो कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन यापुढे कोणत्याही परिस्थितीत सर्व संवगार्तील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व खाते प्रमुखांना दिले आहेत. तसेच कनिष्ठ कर्मचाºयांचे वेतन मिळाल्याशिवाय वरिष्ठ कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांचे वेतन न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनात विविध संवगार्चे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर अदा करण्याची खातेप्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी व संस्था प्रमुख या नात्याने आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
सूरज मांढरे म्हणाले, की सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा झाल्यानंतरच कोणत्याही खातेप्रमुखांचे आणि तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वेतन अदा करण्यात यावे. तसेच अदायगी प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करून वरील सर्व वेतने दरमहिन्याच्या ५ तारखेच्या आत अदा होतील, याची सर्वांनी दक्षता घेण्याची सूचना केली आहे. वेतन अदायगी बाबत विलंब होत असल्यास त्याचवेळेस ती बाब माझ्या निदर्शनास आणून द्यावी. कोणत्याही टेबलावर विलंब झाल्यास संबंधित खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विलंब प्रतिबंध कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल.