निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; प्रल्हाद सिंह पटेल यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:58 PM2023-06-05T20:58:36+5:302023-06-05T20:59:06+5:30

नदीचे सगळ्यात जास्त नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे

Strict action will be taken against Nira river polluters; Pralhad Singh Patel's warning | निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; प्रल्हाद सिंह पटेल यांचा इशारा

निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; प्रल्हाद सिंह पटेल यांचा इशारा

googlenewsNext

बारामती: नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाण्याचा प्रश्न आहे. नदीतील पाण्याचा ‘रिपोर्ट’ सात दिवसात येईल. नीरा नदीच्या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा सगळ्यांसाठी रिपोर्ट खुला करणार आहे. त्यावेळी लोकांनी सुधारले पाहिजे. अन्यथा त्यांनी कारखाने बंद करायची तयारी ठेवा, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिला आहे.
 
सोमवारपासून (दि ५) केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. इंदापुर तालुक्यातील दौऱ्यानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री पटेल यांनी सोनगांव येथील सोनेश्वराचे दर्शन घेतले. तसेच निरा नदीची पाहणी केली. यावेळी नीरा नदीत बारामती तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तसेच फलटण तालुक्यातील कत्तल खाण्याचे दूषित पाणी हे नीरा नदीत सोडल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांनी केला. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. या पार्श्वभुमीवर पटेल बारामती तालुक्यातील निरा वागज येथे गावभेट केला. यावेळी दौऱ्यात बोलताना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीरा नदीच्या दूषित पाण्याचा प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.
  
यावेळी पटेल पुढे म्हणाले, जमिनीतील पाणी खराब झाले आहे का याची देखील माहिती घ्यावी लागेल. नदीत दूषित पाणी जावू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नदीचे सगळ्यात जास्त नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे. नीरा नदीच्या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल. कारवाई कशी केली जाईल ,हे सांगू शकत नाही. पण संकेत मात्र देऊ शकतो. सुधारा नाहीतर परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम देखील पटेल यांनी प्रदुषण करणाऱ्यांना दिला.

...पण बारामती वाल्यांनी अभिनंदन केलं नाही

भाजप नेते राम शिंदे म्हणाले, मी बोलल्या नंतर अहमदनगरचे नामांतर अहिल्या नगर झाले. तुमच्या आमच्या मनातील हे सरकार आहे. बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले. पण बारामतीवाल्यांनी अभिनंदन केलं नाही, याचा खेद वाटतो. मनात आणि ध्यानात असावं लागते तेव्हा ओठावर येतो. देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट आहे. पण ती आपल्याकडे का येत नाही यसाठी प्रयत्न सुरू आहेत. नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यावर पटेल साहेब मार्ग काढतील, असे शिंदे म्हणाले.

Web Title: Strict action will be taken against Nira river polluters; Pralhad Singh Patel's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.