कसबा, चिंचवडमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:02 PM2023-01-24T12:02:25+5:302023-01-24T12:02:39+5:30

निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे

Strict adherence to code of conduct in Kasba Chinchwad Collector Dr. Directed by Rajesh Deshmukh | कसबा, चिंचवडमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

कसबा, चिंचवडमध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

googlenewsNext

पुणे : निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. ठिकठिकाणी मतदार जागृती कार्यक्रमांचे आयोजन करावेत. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी यांचे निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. त्यातील बारकाव्यांची माहिती घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी आलेले आदेश तसेच परिपत्रकांचे अवलोकन करावे. कोविड संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी.

जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक संदर्भातील सर्व कक्षांची तातडीने स्थापना करावी. निवडणूक कालावधीत गंभीर्यपूर्वक काम करावे आणि दैनंदिन अहवाल सादर करावे. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

Web Title: Strict adherence to code of conduct in Kasba Chinchwad Collector Dr. Directed by Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.