आंबेगाव तालुक्यात कोरोना नियमांची कडक अंमलबाजवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:55+5:302021-03-21T04:11:55+5:30
तालुक्यातील सध्या रोज अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले ...
तालुक्यातील सध्या रोज अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत देत सुरुवात विनामास्क फिरणार्या नागरिकांपासून केली आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक या कोरोनाबाबत गांभीर्य घेत नसल्याचे दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव पासून वाचण्यासाठी चेहर्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. असे असूनही अनेकजण मास्क न लावता बिनधास्त बाजारात फिरत आहेत. मास्क न लावणार्या आणि नियम न पाळणार्या नागरिकांवर आता कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. यासाठी गावातील एसटी स्टँड परिसरात, महसूल आणि पोलीस प्रशासनाने मास्क न लावलेल्या नागरिकाकडून ५०० रुपये दंड आकारणी केली जात आहे.
मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी तालुक्याच्या पुर्व भागातील बाजारपेठा, बस स्थानक,भाजी मार्केट मध्ये फिरून मास्क न वापरणार्या दुकानदार तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना मास्क वापरावे असे आवाहनही केले आहे. त्याचप्रमाणे राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील :- लग्न समारंभ,आठवडे बाजार आणि सार्वजनिक कार्यक्रमात आता तरी गर्दी टाळण्याचे आवााहन केले आहे.
--------------------------------------------
-
-२० निगरगुडसर : कोरोना दंड कारवाई
निरगुडसर-ता.आंबेगाव येथे विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई मंचर पोलीसांकडून करण्यात आली.
Sent from RediffmailNG on Android