भोर शहरात व तालुक्यात कडकडीत लॉकडाऊन पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:11+5:302021-04-13T04:11:11+5:30
भोर वार्ताहर भोर प्रशासनाच्या वतीने जीवनावश्यक सेवा वगळता शनिवारी व रविवार वीकेंड लॉकडाऊन घोषीत केला होता याला शहरासह ...
भोर वार्ताहर
भोर प्रशासनाच्या वतीने जीवनावश्यक सेवा वगळता शनिवारी व रविवार वीकेंड लॉकडाऊन घोषीत केला होता याला शहरासह ग्रामीण भागातील दुकानदारांनी सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता. मात्र मास्क न लावता फिरणाऱ्या दहा जणांवर व पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती भोर पोलिसांनी दिली.
भोर शहरात व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी
शनिवार व रविवार दोन दिवस भोर शहरासह तालुक्यात शासनाच्या सूचनेनुसार प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती.यात आरोग्य सेवा दवाखाने तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला होता.त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक फारसे भोर शहराकडे फिरकलेच नाहीत आणी बंदला उत्तम प्रतिसाद दिला होता त्यामुळे भोर पोलीसांना विनामास्क फिरणारे किवा दुकाने उघडणारे विनाकारण भटकणारे अशा ८ ते १० जणांवरच कारवाई करण्यात आल्या इतर वेळी दररोज सुमारे दीडाशे ते दोनशे कारवाइ होत असतात. मात्र नागरिकांनी लाॅकडाऊन पाळल्याने आणि नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे फारशा कारवाई झालेल्या नाहीत.
प्रशासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनला भोर शहर व ग्रामीण भागातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणी दोन दिवस शहरात फारसे नागरिक फिरकले नाहीत.त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या ८ ते १० जणांवरच कारवाई झाल्या माञ यातील अनेकांना समज देऊन सोडण्यात आल्याचे
हवालदार शिवाजी काटे यांनी सांगितले.