सावधान! लग्न व अन्य समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास पडेल महागात; पुण्यासाठी कडक निर्बंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 07:31 PM2020-09-06T19:31:37+5:302020-09-06T19:34:09+5:30

पुणे जिल्ह्यात लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांवर पुन्हा कडक निर्बंध; कडक अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश 

Strict restrictions on wedding in pune district Collector issues guidelines | सावधान! लग्न व अन्य समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास पडेल महागात; पुण्यासाठी कडक निर्बंध 

सावधान! लग्न व अन्य समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास पडेल महागात; पुण्यासाठी कडक निर्बंध 

googlenewsNext

पुणे: गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमा निमित्त होणारी गर्दी आणि मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे. त्यात लाॅकडाऊनचे सर्व निर्बंध उठवल्याने ही संख्या अधिक झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवरच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांवर कडक निर्बंध घातले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देशमुख यांनी दिले आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे. पन्नास व्यक्तीची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रसंचालक यांच्यासह गृहीत धरावी.
 
मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर
(थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्याव्यात .ऐवढेच नाही तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यावर थेट गुन्हे दाखल करा व मंगल कार्यालयांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील देशमुख यांनी दिले आहे.

हे आहेत पुणे जिल्ह्यासाठीचे नवीन नियम 
- लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या 50 जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करावीत. (ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रासचालक यांच्यासह राहील) कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे.
- लग्न समारंभाचे ठिकाणी जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) सहा फुट राखणे बंधनकारक राहील. लग्नसमारंभाचे ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील अशा पध्दतीने खुणा (मार्किग) कराव्यात. जेवण करताना मास्क काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारण्यावर निबंध ठेवावेत.
- लग्न समारंभाचे ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, वाढपे, आचारी, वाजंत्री, भटजी व वन्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
- लग्न समारंभाचे ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन धुंकणे व असेही थुकणेस व मद्यपान करण्यास सक्त मनाई राहील. आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनिय कारवाईस पात्र राहील.
- लग्नसमारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / खुले लॉन / सभागृह वापरणेत यावी. कोणत्याही परिस्थीतीत वातानुकूलित सेवेचा (AC) चा वापर करणेत येऊ नये.
- मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्यावी
- लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग, खुच्च्या, लग्नाचा संपूर्ण हॉल, किचन, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निजतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी.
- सोशल डिस्टन्सचा वापर व अन्य नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक किवा दोन प्रतिनिधी नेमावेत.
- लग्न समारंभात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी व सर्व नियम व अटी पालन करण्याबाबत जनजागृती करावी.
- लग्नसोहळयाचा सर्व विधीची पाहणी करण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, कामगार तलाठी व पोलीस
यांचे भरारी पथक कार्यरत करावे. या ठिकाणी नियमांचे उलंघन झाल्यास गुन्हे दाखल करावेत.
- लग्न समारंभाचे ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे व वरील सर्व नियम व अटींचे पालन करत
नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह तात्काळ बंद करणेत येतील, विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यात सादर करावी.

Web Title: Strict restrictions on wedding in pune district Collector issues guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.