आधारनोंदणीत गैरप्रकार केल्यास कडक कारवाई

By Admin | Published: October 4, 2016 01:49 AM2016-10-04T01:49:41+5:302016-10-04T01:49:41+5:30

जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांचे आधारकार्ड काढण्यासाठी मशिन कार्यरत आहेत. या कामामध्ये काही गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी.

Stricter action in case of misrepresentation | आधारनोंदणीत गैरप्रकार केल्यास कडक कारवाई

आधारनोंदणीत गैरप्रकार केल्यास कडक कारवाई

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांचे आधारकार्ड काढण्यासाठी मशिन कार्यरत आहेत. या कामामध्ये काही गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी. सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर बैठकीत मावळ तालुक्यासाठी आधारकार्ड मशिन उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे यामध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली होती. त्यानुसार सक्त कारवाई करण्याचा इशारा राव यांनी दिला.
याबाबत सर्व आरोग्य केंद्राची तपासणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन, वजनमापे, पिक-विमा, शिक्षण विभागातील सेवा रासायनिक फवारणीच्या औषधे जास्तीच्या दराने खरेदी करणे, एस. टी.महामंडळ, विद्युत विभागाबाबत आपआपल्या भागातील तक्रारी उपस्थिती अशासकीय सदस्यांनी मांडल्या.

Web Title: Stricter action in case of misrepresentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.