माकेट यार्डातील गुळ-भुसार बाजारात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:35+5:302021-07-17T04:10:35+5:30

पुणे : केंद्र सरकारने डाळींचा साठा करण्यास मर्यादा घातल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करण्यात पुकारेल्या बंदला शुकवारी (दि. १६) ...

Strictly closed in the jaggery market in the market yard | माकेट यार्डातील गुळ-भुसार बाजारात कडकडीत बंद

माकेट यार्डातील गुळ-भुसार बाजारात कडकडीत बंद

googlenewsNext

पुणे : केंद्र सरकारने डाळींचा साठा करण्यास मर्यादा घातल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करण्यात पुकारेल्या बंदला शुकवारी (दि. १६) शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. गुळ-भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे, असे दि पूना मचर्टस चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

माकेट यार्डात शुक्रवारी सकाळपासून गाड्या उतरून घेणे तसेच भरण्याचे काम ठप्प झाले होते. छोट्या व्यापार्‍यांना ५० क्विंटल आणि कारखानदारास एक हजार क्विंटल कडधान्ये साठवता येतील, असे निर्बंध घालणारा केंद्रीय कायदा लागू केला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांत असंतोष निर्माण झाला आहे. डाळींच्या उत्पादन हंगामात साठवणुकीवर मर्यादा आल्याने भाववाढ अटळ असल्याचे चेंबरचे म्हणणे आहे. मार्केटयार्डातील गुळ-भुसार खेरीज नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ तसेच रविवार पेठेतील घाऊक व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

साठवणुकीवर मर्यादा नसल्याने डाळ तयार करणार्‍या कारखानदारांनी यापूर्वीच शेतमाल खरेदी करून ठेवला आहे. दररोज ५०० क्विंटलची डाळ तयार करणारे अनेक कारखाने आहेत. त्यांना दोन दिवस कारखाना चालवता येईल एवढीच साठवणूक करता येत असेल तर काऱखाने चालणार कसे हा प्रश्न आहे. याखेरीज, गतवर्षी साठवणुकीवरील निर्बंध हटवत कडधान्याला जीवनावश्यक वस्तूंतून वगळण्याची घोषणा केंद्राने केली हाेती. व्यापार्‍यांनी त्या धोरणानुसार व्यवहार केले. गतवर्षीचा हंगाम आता संपत आला आहे.

Web Title: Strictly closed in the jaggery market in the market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.