वालचंदनगर परिसरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:39+5:302021-04-18T04:09:39+5:30
वालचंदनगर ग्रामपंचायत व पोलीस विभागाने वालचंदनगर हा हॉटस्पॉट भाग जाहीर केल्याने शंभर टक्के व्यवहार करण्यात आला आहे. अशी माहिती ...
वालचंदनगर ग्रामपंचायत व पोलीस विभागाने वालचंदनगर हा हॉटस्पॉट भाग जाहीर केल्याने शंभर टक्के व्यवहार करण्यात आला आहे. अशी माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड यांनी दिली आहे.गेल्या ८ दिवसांत वालचंदनगर व कळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासनावर कमालीचा ताण पडला आहे. फक्त दवाखाने व मेडिकल व्यवस्था वगळता कडकडीत बंद करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना गरजेची असून यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे मत पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी सांगितले. वालचंदनगर कंपनीच्या सहकार्याने वालचंदनगरला कंपनी दवाखाना कोविड सेंटर म्हणून सुरू करण्यात आला असून परिसरातील १५ गावांतील कोरोना रुग्ण याठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. कोरोना वाढत चालला असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सरपंच कुमार गायकवाड यांनी केले.वालचंदनगरला व कळंब गावाला कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
वालचंदनगरला कोरोना हॉटस्पॉट घोषित केल्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
१७०४२०२१-बारामती-१४