प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:10+5:302021-03-05T04:10:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरी व ...

Strictly enforce the Animal Cruelty Prevention Act in the district | प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करा

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरी व ग्रामीण स्तरावर लोकसहभाग घेत प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासणी व कारवाई करणे आवश्यक आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथे दिले.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक गुरुवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी समितीचे अशासकीय सदस्य हरिष खोमणे, संदीप नवले, सुरेश रास्ते, नेहा पंचामिया, मोहन मते, सचिन मोकाटे, शंभू पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, पोलीस उपअधीक्षक अमृत देशमुख, वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक विजया करांडे, देहु रोड कॅन्टोन्मेंटचे एम. ए. सय्यद उपस्थित होते.

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावेत, असे सांगून जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, पोलीस, पशुसंवर्धन तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात वन्य प्राणी आल्यास याबाबत मार्गदर्शका तयार करावी. यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा. तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे. प्राणी लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसेल व जागृतीही होईल. समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्राणी क्लेश समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन, पोलीस, वनविभाग तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Strictly enforce the Animal Cruelty Prevention Act in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.