बलात्कार आरोपीला कठोर शासन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:33+5:302021-03-31T04:10:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील जनता वसाहत सहकारनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना ...

Strictly punish the rape accused | बलात्कार आरोपीला कठोर शासन करा

बलात्कार आरोपीला कठोर शासन करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील जनता वसाहत सहकारनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करा आणि पीडितेला न्याय द्या, असे निवेदन भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णाजी इंदलकर यांना देण्यात आले.

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात आमदार माधुरी मिसाळ, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, प्रदेश महिला मोर्चा सचिव वर्षा डहाळे, विनया बहुलीकर यांचा समावेश होता.

“राज्यात तरुणी, महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होते आहे. पुण्यात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही असेच यातून दिसते आहे,” असे खापरे यांनी सांगितले.

या प्रसंगी नगरसेवक आनंद रिठे, नगरसेवक महेश वाबळे, पर्वतीचे संघटन सरचिटणीस प्रशांत दिवेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Strictly punish the rape accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.