गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार

By admin | Published: October 15, 2014 05:21 AM2014-10-15T05:21:57+5:302014-10-15T05:21:57+5:30

थेऊरजवळील कोलवडी येथे हवाईदलाचे विमान कोसळल्यावर संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.

Strike the crowd | गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार

गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार

Next

वाघोली/पिंपरी सांडस : थेऊरजवळील कोलवडी येथे हवाईदलाचे विमान कोसळल्यावर संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला.
कोलवडी येथील साळुंके मळा परिसरामध्ये असणा-या सोपान व रमेश गायकवाड यांच्या उसाच्या शेतामध्ये एक सुखोई विमान आवाज करीत कोसळले. धुराचे लोट काही वेळाने अधिकच वाढू लागल्याने परिसरात असणा-या दहा ते बारा नागरीकांनी जवळच असणा-या विहीरीतून पाणी काढून पाण्याच्या सहाय्याने विमानाची आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघातामध्ये उच्चदाबाची विद्युत तारही तुटली. यानंतर विमान कोसळल्याची घटना वा-यासारखी पसरली. घटनेची माहीती कळताच परिसरातील नागरिकांनी विमान पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
गायकवाड म्हणाले, ‘‘वाडेबोल्हाई येथून विमान पुण्याच्या देशेने जात असताना हवेमध्ये विमानातून मोठा आवाज व घरघर ऐकू येत होती. माझ्या घरापासून विमान ४०० मीटरच्या अंतरावर कोसळले. विमान पाचशे फुट घसरत जावून शेताच्या बांधाला अडकले व विमानाचा पुढचा भाग तुटून काही मीटरच्या अंतरावर जावून पडला. या घटनेमध्ये माझ्या घरच्यांसोबत मी भयभीत झालो होतो.विमानातून धुर येत असल्याचे आम्हाला समजल्यानंतर दहा ते बारा जणांनी मिळून पाण्याच्या सहाय्याने धुर विझविण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना माहीती दिली. शेतामध्ये विमान कोसळल्याने सुमारे अर्धा एकर उसाच्या पिकाचे व पाईपलाईने चे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बंधु सोपान गायकवाड, सुभाष गायकवाड, सुभाष उंद्रे यांच्या शेतीचेही नुकसान झाले आहे.

Web Title: Strike the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.