पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे कर्मचारी संपावर; १४ महिन्यांपासून वेतनच नाही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:29 PM2017-12-18T12:29:47+5:302017-12-18T13:21:01+5:30
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत.
सिंहगड रस्ता : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत. संस्थेच्या मुख्य कॅम्पसच्या सांस्कृतिक केंद्रात ३०० पेक्षाही जास्त कर्मचारी आहेत.
आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) यांच्या नियमानुसार वेतन झाले पाहिजे, वेतन राष्ट्रीय कृत बँकेतच जमा व्हावे, अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या संपात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वडगाव, पुणे येथील चार शाखेतील ६००, नऱ्हे येथील दोन शाखेतील १७०, कोंढवा येथील १५०, वारजे येथील १३०, लोणावळा येथील २६० शिक्षक आणि कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही वेतन रखडले आहे, परंतु ते व्यवस्थापनाच्या भिती पोटी संपात सहभागी झाले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान वेतन मिळेपर्यंत आणि प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत, तोवर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.