खेड तालुक्यात १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलन सुरु; पुढील पाच दिवस होणार ज्ञानेश्वरी वाचन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:34 PM2021-06-29T17:34:59+5:302021-06-29T17:35:06+5:30

पुणे रिंगरोड जमीन संपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

strike a farmers of started in Khed taluka; Dnyaneshwari reading will be held for the next five days | खेड तालुक्यात १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलन सुरु; पुढील पाच दिवस होणार ज्ञानेश्वरी वाचन

खेड तालुक्यात १२ गावच्या शेतकऱ्यांचे चक्री उपोषण आंदोलन सुरु; पुढील पाच दिवस होणार ज्ञानेश्वरी वाचन

Next
ठळक मुद्देजमिनी संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

राजगुरुनगर: पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी खेड तालुक्यातील १२ गावांच्या शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषण आंदोलन सुरू केले आहे. १२ गावांपैकी रोज एका गावातील किमान पाच शेतकरी पुढील चार दिवस रोज ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत.

तालुक्यातील १२ गावातून पुणे - नाशिक रेल्वे आणि रिंग रोड प्रकल्प होणार आहे. खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, आळंदी, च-होली, चिंबळी, केळगाव, मरकळ, धानोरे, सोळू, गोलेगाव या गावांचा समावेश आहे. रेल्वे मार्गासाठी ५० ते ८० मीटर आणि रिंग रोडसाठी सर्रासपणे ११० मीटर अशी एकूण ५८६ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. सर्व गावांतील शेतक-यांचा जमीन संपदनाला विरोध आहे.

अनेकजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. जमिनी संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आंदोलनात खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी, कल्पना गवारी, अनिता शेळके, आणि शेतकरी सहभागी झाले होते.

४६ गावात होणार भूसंपादन 

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील पूर्व मार्गासाठी ८५९ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. हा मार्ग १०४ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोरमधील ४६ गावांत भूसंपादन केले जाणार आहे.

Web Title: strike a farmers of started in Khed taluka; Dnyaneshwari reading will be held for the next five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.