भांडणे सोडवणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:01+5:302021-04-21T04:12:01+5:30

पुणे : भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आले. याप्रकरणी खडक पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रोहित ...

Strike the mediator with the sword | भांडणे सोडवणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार

भांडणे सोडवणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार

Next

पुणे : भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आले. याप्रकरणी खडक पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

रोहित रागीर (वय २०, रा. घोरपडे पेठ) याने फिर्याद दिली आहे. फुग्या ऊर्फ योगेश गाटे, सुशील मिसाळ, आद्रया, भय्या, करण ऊर्फ ठोब्या आगलावे, सनी शिंदे (सर्व रा. लोहियानगर) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना खडकमाळ आळी येथील मनपा कॉलनीमध्ये १६ एप्रिलला रात्री घडली.

रोहितचा मित्र रेतिष व आरोपी यांच्यामध्ये आठ दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. ही भांडणे रोहितने सोडवली होती. याचा राग सर्व आरोपींच्या मनात होता. शुक्रवारी रात्री रोहित व ऋतिक हे मनपा कॉलनीतील रस्त्यावर थांबले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी रोहितला शिवीगाळ करीत आमच्या भांडणात का पडला? असा जाब विचारला. यानंतर फुग्याने आता ‘तुझी विकेटच काढतो’ म्हणत शर्टाच्या आत पाठीमागे लपवलेली तलवार काढली. या तलवारीने रोहितवर वार केला. मात्र तो त्याच्या हाताच्या अंगठ्याला लागून गेला. या वेळी रोहितला वाचवण्यासाठी ऋतिक मध्ये पडला. मात्र आरोपींनी त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक माने अधिक तपास करत आहेत.

Web Title: Strike the mediator with the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.