मंचरमध्ये दोन गटांत हाणामारी; ५१ जणांवर गुन्हा
By admin | Published: July 31, 2015 03:50 AM2015-07-31T03:50:26+5:302015-07-31T03:50:26+5:30
येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारीची घटना घडली. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसात १५ जण व इतर ३६ जणांच्या विरोधात दंगलीचा
मंचर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारीची घटना घडली. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसात १५ जण व इतर ३६ जणांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंचर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
अकबरअली रियाजअली मीर यांनी फिर्याद दिली. दत्ता गांजाळे यांचा प्रचार करीत असल्याचा राग आल्याने बुधवारी रात्री ५ ते ६ जणांनी मीर यांना मारहाण केली. पोलिसांनी राजू इनामदार, कुमेल इनामदार, मन्सूर महंमद शेख, रा. मंचर, अशरफ नवाब शेख, खालीद नवाब शेख, शैबाज नवाब शेख, अरमान शेख, हसन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजू इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मीर उर्फ चिंटू, नाझा शब्बीरअली इनामदार हे माझ्या विरुदध अपप्रचार करीत होते. बुधवारी रात्री इनामदार व त्यांचे नातेवाईक घरी असताना गावातील ३० लोक आले व त्यांनी आमच्या वारसा हक्काबाबत वादाचे कारणावरुन व ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली़ आज पहाटे ते लोक परत आले व शिवीगाळ करत त्यांनी इनामदार यांचा मुलगा कुमेल याला हत्याराने मारहाण केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी इनामअली हसनअली इनामदार, गाजी अब्बास हसरतअली, नायब हसरतअली, दायम इनायतअली, अकबरअली रियाजअली, नाझा शब्बीर अली, शब्बीरअली कडूमियाँ व इतर ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरुन दोन्ही बाजूकडील १५ जण व इतर ३६ अनोळखी व्यक्तींवर दंगलीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. (वार्ताहर)