कंपासमधील कटर ब्लेडने वार! दगडाने मारहाण; राहुल हंडोरेची कबुली, पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 09:48 AM2023-06-30T09:48:46+5:302023-06-30T09:49:57+5:30

Darshana Pawar Murder Case- फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही

Strike with the cutter blade in the compass stoning Rahul Handore confession, increase in police custody | कंपासमधील कटर ब्लेडने वार! दगडाने मारहाण; राहुल हंडोरेची कबुली, पोलीस कोठडीत वाढ

कंपासमधील कटर ब्लेडने वार! दगडाने मारहाण; राहुल हंडोरेची कबुली, पोलीस कोठडीत वाढ

googlenewsNext

पुणे : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर, आरोपी आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (३ जुलै) वाढ केली आहे.

लग्नासाठी नकार दिल्याने दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हांडोरे याने नुकतीच पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तूंची माहिती घेत त्या जप्त करण्यात येत आहेत. १८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. आराेपीला २१ जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक केली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने हांडोरे याला गुरुवारी (दि. २९) न्यायालयात हजर केले होते. हांडोरे याने गुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त केलेले नाहीत. तसेच खून करून तो काही दिवस फरार झाला होता. फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यावर आरोपीच्यावतीने ॲड. गणेश माने यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नसून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तिवाद ॲड. माने यांनी केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असे नमूद करीत न्यायालयाने हांडोरेच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.

Web Title: Strike with the cutter blade in the compass stoning Rahul Handore confession, increase in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.