विकासकामांसाठी प्रयत्नशील - भरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:09 AM2019-02-09T00:09:47+5:302019-02-09T00:10:15+5:30
इंदापूर शहरातील नागरिक किंवा पदाधिकारी माझ्याकडे आल्यानंतर मी कोणत्याही प्रकारची विचारणा करत नसून, जनतेसाठी विकासाचे काम असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर - शहरातील नागरिक किंवा पदाधिकारी माझ्याकडे आल्यानंतर मी कोणत्याही प्रकारची विचारणा करत नसून, जनतेसाठी विकासाचे काम असल्याने ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहतो, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील इंदापूर - अकलूज - सांगोला रस्ता राज्य मार्ग १२५ ची सुधारणा करणे व डोंगराई चौक ते देशपांडे व्हेज, बाब्रस मळा चौक ते श्रीराम चौक ते सरस्वतीनगर अहिल्यादेवी उड्डाणपुला पर्यंत व रस्ता करण्याच्या कामांचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रदीप गारटकर म्हणाले, इंदापूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी मिळत होता. मात्र यांना विकास करायचा नाही. म्हणून यांनी नगरपालिकेचे एक पत्र दिले नाही. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना विकासाचा छंद आहे. मात्र इंदापूरकरांना नगरपालिका निवडणुकीला ते कळले नाही.
यावेळी माजी उपनराध्यक्ष धनंजय बाब्रस, विठ्ठलराव ननवरे, अनिल राऊत, श्रीधर बाब्रस, वसंतराव माळुंजकर, प्रा. अशोक मखरे यांनी उस्फुर्तपणे भाषणे केली. या कार्यक्रमासाठी इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अभिजीत तांबिले, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, धनंजय बाब्रस, अरविंद वाघ, डॉ. शशिकांत तरंगे उपस्थित होते.
इंदापूर शहरात न्यायालयासाठी १४ कोटी रुपये, त्यामध्ये निवासस्थानासाठी ३ कोटी रुपये व पालखी तळासाठी दीड कोटी, प्रशासकीय इमारतीसाठी बारा कोटी असे अनेक कामे मार्गी लावले आहेत. मात्र मला विरोधकांवर टीका करायची नसून, विकास कामे करायची आहेत.
- दत्तात्रय भरणे