नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:01+5:302021-05-29T04:09:01+5:30
इंदापूर : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड झाली. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ ...
इंदापूर : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड झाली. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरातील गोतंडी, शेळगाव, तसेच उजनी बॅकवॉटर पट्ट्यातील गंगावळण, कळाशी या परिसरातील ज्या केळी बागा शेतात उभ्या होत्या. त्या कोसळल्या आहेत तर ऊस, मका डाळिंब तसेच द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले. या सर्व परिसराची पाहणी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (दि. २८) केली. या वेळी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, इंदापूर तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी व पंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी संवाद सांगताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
दत्तात्रय भरणे यांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान वादळी वाऱ्याने, पावसाने झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश तसेच या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे अशाही घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित पाहणी दौऱ्यात दिले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
मागील दोन वर्षांपासून अनेक संकटांशी सामना नागरिकांना व जनतेला करावा लागतो आहे. मात्र बळीराजा आपली शेती पडीक न ठेवता वेगवेगळे प्रयोग शेतात राबवतो. व शेती पिकवतो आणि येणाऱ्या आपत्तीमध्ये त्या शेतकऱ्याचे नुकसान होते. हे नुकसान भरून न येणारे असते, शेतकऱ्यांची अशी अवस्था पहिलीची मनाला वेदना होतात. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील ज्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे, ते ज्या घरांची पडझड झाली आहे त्यांना नक्की शासनाकडून मदत मिळेल, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दुचाकीवर
नुकसानग्रस्त शेतीपिकाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दत्तात्रय भरणे अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन दुचाकीवर पोहोचले. शेतीच्या बांधावरच पंचनाम्याचे आदेशही दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धीर मिळाला आहे. मंत्री असतानाही कोणताही ढोल मोल न करता, शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून भरणे यांचा पाहणी दौरा केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
२८ इंदापूर
इंदापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व संबंधित विभागाचे अधिकारी.
===Photopath===
280521\28pun_4_28052021_6.jpg
===Caption===
२८ इंदापूर इंदापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व संबंधित विभागाचे अधिकारी.