Pune Rain: पुण्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी; पुढील ३ दिवसात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता
By नितीन चौधरी | Published: March 16, 2023 06:41 PM2023-03-16T18:41:39+5:302023-03-16T18:41:49+5:30
सकाळी ऊन तर सायंकाळी गडगडाटी पाऊस अशा वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी घेतला
पुणे : सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाट तसेच वादळी वाऱ्यांसह शहराला जोरदार सरींनी झोडपले. आकाशात काळ्याकुट्ट ढगांच्या गर्दीने दुपारी पाच वाजताच अंधार दाटला होता. अखेरीस सायंकाळी उशिरापर्यंत शहराच्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सकाळी ऊन तर सायंकाळी गडगडाटी पाऊस अशा वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी घेतला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसात मेघगर्जना विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री साडेआठपर्यंत शहरात -- मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मध्य भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत आहे. शहरात बुधवारी झालेल्या पावसामुळे रात्रीपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, गुरुवारी सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. त्यामुळे दुपारी उकाडा जाणवायला लागला. ढगांची गर्दी दाटण्यास सुरूवात झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने दिलाच होता. त्यानुसार वातावणात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली. अखेर पाचच्या सुमारास शहराच्या बहुतांश भागांत ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींनी पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस मध्यम स्वरुपाचा होता. शहरातील हडपसर, कोथरूड, वाघोली, सिंहगड रस्ता, औंध, बाणेर, सातारा रस्ता, मध्यवर्ती पेठा, वारजे, वानवडी आदी भागांत पावसाने हजेरी लावली. गुरुवारी शहरात ३१.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर हडपसर येथे हेच तापमान ३३.५ अंश सेल्सिअस होते.
पुढील तीन दिवसांचा अंदाज
पुणे व आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रात्री साडेआठपर्यंतचा शहरातील पाऊस
शिवाजीनगर पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा